Friday, June 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : ‘ऑपरेशन सिंदूर’, भारतीय सैन्याच्या सन्मानासाठी चिंचवड मध्ये रॅली

पिंपरी चिंचवड – ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताच्या अत्यंत शूर सैन्य दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून भारतातील माता – भगिनींचे सिंदूर पुसणाऱ्या क्रूर अतिरेक्यांवर भारतीयांना अपेक्षित असा सूड उगवला आहे. (PCMC)

भारताच्या शक्तिशाली सैन्य दलाला नमन करण्यासाठी आणि भरघोस समर्थन देण्यासाठी क्रांतिवीर चापेकर बंधू चौक ते महासाधू मोरया गोसावी क्रीडांगण केशवनगर अशी चिंचवडगाव परिसरात तिरंगा रॅलीचे ‘राष्ट्रप्रेमी चिंचवडकर’ नागरिकांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला चिंचवडकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (PCMC)

---Advertisement---

रॅलीत चिंचवडगावातील स्थानिक माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे व माजी स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, सामाजिक कार्यकर्ते हर्षद नढे, अजित कुलथे, कैलास सानप, प्रदीप सायकर, शिवम डांगे, नूतन चव्हाण, सुरेखा जाधव, महेश मिरजकर, आदित्य रेवतकर, अतुल कांबळे या प्रमुख कार्यकर्त्यांसह चिंचवडकर नागरिक सहभागी झाले होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles