Wednesday, April 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : विजयादशमीनिमित्त संघर्षमय जीवनावर मात करणाऱ्या यशस्विनी महिलांचा सन्मान

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटचे मुख्य प्रवक्ते आणि अंघोळीची गोळीचे संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील यांनी समाजातील संघर्ष करणाऱ्या दहा महिलांचा “आशा दुर्गा सन्मान” देऊन सन्मान केला. यावेळी नीता चौगुले, रुचिता बंडी, नीता रसाळ, शकुंतला कुर्हाडे, माधुरी चौगुले, वनिता राठोड, रेखा माटे,चंद्रकला इंदूरकर, उर्मिला चौरे आणि बबिता गायकवाड या संघर्ष केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

---Advertisement---

माझ्या आईने गेली ३५ वर्षे पोस्टाचे पैसे गोळा करून, छोटे मोठे शिवणकाम करून मला आणि माझ्या भावंडांना शिक्षण दिले म्हणूनच आईच्या नावाने ” आशा दुर्गा सन्मान हा सोहळा घेत आहे,असे माधव पाटील म्हणाले. हा सन्मान आईचा सन्मान होता म्हणूनच माधव पाटील यांची आई आशा धनवे आणि प्रेमलोक पार्क मित्र मंडळातील युवा कार्यकर्त्यांकडून या दहा आईंचा सन्मान करण्यात आला. यावेळी माधव पाटील यांनी प्रत्येक आईची संघर्षाची गोष्ट सांगितली. अवघ्या ३-४ वर्षाच्या संसारानंतर पती गेले पण नीता चौगुले मुंबईला नोकरीला उपडाऊन करून दोन मुलांना सांभाळले.रुचिता बंडी या प्रेमलोक पार्कमधील १०० फ्लॅट असणाऱ्या एल नक्षत्रम या सोसायटीच्या चेयरमन आहेत आणि दर महिन्याला ६० किलो प्लास्टिक रिसायकल करतात. नीता रसाळ ह्या १४० जणांचे अनाथ आश्रम चालवतात. शिवणकाम करून त्यांनी अनाथाश्रम उभारला. शकुंतला कुऱ्हाडे मंदिरात राहिल्या, बांधकाम साईटवर विटा मातीकाम, ओझी वाहून तीन मुलींची लग्न केली,तर मुलाला एमसीए पर्यंत शिकवले. माधुरी चौगुले यांनी पती गेल्यावर खानावळ आणि पाळणाघर सुरु करून मुलांना शिकवले. मुलींना शिकवायचेच म्हणून वनिता राठोड यांनी शिवणकाम, डबे करणे, फराळ बनवून देणे, रांगोळी काढून देणे अशी अनेक कामे करून दोन्हीही मुलींना चांगले शिक्षण दिले. रेखा माटे यांनी शिवणकाम केले, चहा आणि वडापाव विकून संसारयाची चाके ओढली. चंद्रकला इंदूरकर यांनी ३० वर्षे शिवणकाम केले आणि मुलांना उच्चशिक्षित करून मेक्सिको सारख्या देशात काम करण्यास पाठवले. उर्मिला चौरे यांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना विविध कलागुण शिकवले, अनेक महिलांना पैसे न घेता शिवणकाम शिकवले. बबिता गायकवाड यांनी घर चालवण्यासाठी दवाखान्यात मावशी म्हणून काम केले. तिथे साफसफाईची सर्व कामे केली. या संघर्ष केलेल्या महिलांचा सत्कार केल्याबद्दल प्रेमलोक पार्क परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे संयोजन नीता पोईपकर, अजित जाधव, सुमेध पानसे, नेल्सन अरुलदास, निखिल पोईपकर, मंडळाचे अध्यक्ष निखिल चिंचवडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेमलोक पार्क मित्र मंडळाचे कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles