Saturday, May 3, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : अक्षयतृतीयेनिमित्त श्री स्वामी समर्थ महिला मंडळातर्फे स्वामींना आंब्याची आरास

पिंपरी चिंचवड – शिवतेजनगर, चिंचवड येथील स्वामी समर्थ महिला मंडळातर्फे अक्षयतृतीयेनिमित्त स्वामींना आंब्याची आरास करण्यात आली होती. (PCMC)

त्यानंतर महिला मंडळ यांनी हे आंबे देहू येथील “वास्तल्य” या अनाथ आणि दिव्यांग आश्रमातील मुलांना या आंब्यांचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी महिला मंडळाने या सेवाभावी संस्थेस सदिच्छा भेट दिली आणि त्या मुलांना आंबे वाटप केले. (PCMC)

यामध्ये अंजली देव, सारिका रिकामे, नीलिमा भंगाळे, गीतांजली पाटील, अश्विनी केवडकर, कांचन नारखेडे, केतकी वजे, सुनीता वायाळ ह्या महिलांचा समावेश होता. (PCMC)

खरेच हा आम्हा सर्व महिलांसाठी एक अद्भुत आणि अविस्मरणीय असा दिवस होता. त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हा सर्वांना खूप समाधान वाटले.

---Advertisement---

---Advertisement---

तेथील वृषाली देवतरसे मॅडम यांची उत्तम व्यवस्था आणि त्यांचा संपूर्ण स्टाफची उत्तम देखरेख आणि एकंदरीत मुलांची पोटच्या मुलाप्रमाणे घेणारी जबाबदारी पाहून आम्हा सर्वांचे मन हेलावून गेले….खरेच मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे याची साक्षात प्रचिती आली. आणि आम्हा सर्व महिला मंडळाला अशी संधी प्रतिष्ठान चे संस्थापक, अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्यामुळे मिळाली त्याबद्दल त्यांचे देखील संपूर्ण महिला मंडळ तर्फे खूप खूप आभार मानले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles