Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्वसाधारण सभा संपन्न

वर्षभरात ज्येष्ठांसाठी विविध कार्यक्रम राबविण्याचा निर्धार

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघाचे १० वी सर्वसाधारण सभा (15 जून) रोजी विरूंगळा केंद्र महात्मा फुलेनगर, येथे यशवंत कण्हेरे यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. pcmc

---Advertisement---

ज्येष्ठ नागरिक महासंघ, पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष वृषाली मरळ व स्वीकृत सदस्य अरुण बागडे यांच्या उपस्थितीत व संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवरायांचे प्रतिमा पूजनाने सभेला प्रारंभ झाला. pcmc

प्रमुख पाहुणे वृषाली मरळ म्हणाले, अलीकडच्या काळात कुटुंबातील सर्वजण कामात व्यस्त असल्याने ज्येष्ठांकडे कोणीही लक्ष देत नाही, ही बाब मात्र ज्येष्ठांसाठी निराशादायक ठरते. अलीकडच्या काळात कुटुंबातील सर्वजण कामात व्यस्त असल्याने ज्येष्ठांकडे (Senior citizen) कोणीही लक्ष देत नाही.मुळातच ज्येष्ठांनी परिस्थितीशी जुळवून घेणे गरजेचे आहे. सामाजिक कामांत ज्येष्ठांनी योगदान द्यावे, असे वृषाली मरळ यांनी यावेळी सांगितले. pcmc news

यावेळी सर्वांचे स्वागत करत संघाच्या उपक्रमाविषयी सल्लागार विश्वास सोहोनी यांनी माहिती दिली तर सचिव दिनेश पाटील यांनी संघाच्या वर्षभरातील जमाखर्चाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. खजिनदार मधुकर धकाते त्यांनी पुढील वर्षाच्या नियोजन व तरतुदी संबंधी माहिती दिली. pcmc

अध्यक्ष यशवंत कण्हेरे यांनी येणार्‍या काळात सभासदांच्या सहकार्याने विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे जाहिर केले. सल्लागार शिवानंद चौगुले यांनी सर्वांचे आभार मानले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles