पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चिंचवड येथे मुंबई-पुणे महामार्ग ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या दिशेने जाणा-या मार्गादरम्यान असलेल्या रेल्वे मार्गावर नव्याने पूल उभारण्याबाबतच्या विषयासह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत मान्यता दिली. (PCMC)
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते.
या विषयांना प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

या जुन्या पुलास ४७ वर्षे झाली असून रेल्वे विभागाने सदर पुलाचे आयुष्य संपले आहे, असे पत्र मनपास पाठवले आहे.
चिंचवड येथील रेल्वे मार्गावर मुंबई-पुणे महामार्ग ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या दिशेने वाहतुकीसाठी दोन समांतर रेल्वे पुल अस्तित्वात आहेत. चिंचवड स्टेशनवरुन चिंचवड गावाकडे जाणारे डाव्या बाजुकडील पुलाचे आयुर्मान संपले असल्याने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने या पुलाची पाहणी करण्यात आली होती. (PCMC)
तज्ञांच्या सूचनेनुसार जुन्या पुलावर अवजड वाहनास प्रवेश बंदी करून (Height Restrictor) (सर्व बसेसह) वाहतूक करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी असलेले जुने पाडून नव्याने पूल उभारण्याबाबत महानगरपालिकेला भारतीय रेल्वे विभागाकडून सुचित करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने तज्ञांच्या मागर्दर्शनाखाली जुने पूल पाडून नव्याने पूल उभारणी करण्याच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.


हे ही वाचा :
मोठी बातमी : बॉटल बंद पाणी ‘अतिधोकादायक’ यादीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीची जोरदार तयारी
गिनी मध्ये फुटबॉल मैदानावर दंगल, 100 ठार
डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी, डॉलर बदलण्याचा विचार सोडा…
NFR : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत 5647 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती