रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या १२७ वा स्मृतीनिमित्त चर्चासत्र (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – कामगार हा महत्त्वाचा घटक आहे देशातील आणि महाराष्ट्रातील कामगार संघटनांनी अनेक कायदे टिकवले, कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणले.
जेवणाची सुट्टी, आठवड्याची सुट्टी, तसेच कामाच्या वेळा कमी करून घेतल्या मात्र आता नव्या धोरणानुसार संघटनेचे अस्तित्व धोक्यात आले असून कामगारांचे हक्क मिळवण्यासाठी कामगार हित संवर्धक संघटनांची गरज आहे असे प्रतिपादन कामगार प्रशिक्षक, साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. (PCMC)

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, बांधकाम कामगार विभाग, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ” कामगार चळवळीचे सध्याचे स्वरूप आणि दिशा ” यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
चर्चासत्र अध्यक्षस्थानी लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, लेखक, कामगार नेते अरुण गराडे,गुणवंत कामगार जयवंत भोसले, मनपा समिती सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, किसन भोसले, सलीम डांगे, सचिव तुषार घाटूळे, महिलाध्यक्षा माधुरी जलमुलवार, उपाध्यक्ष राजेश माने, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, सहदेव होनमाने, फरीद शेख, लाला राठोड, ओमप्रकाश मोरया, इंदुबाई वाकचौरे ललिता चव्हाण आदी उपस्थित होते.
सदाफुले म्हणाले की, महापुरुष आणि कामगार चळवळीतील नेत्यांच्या जयंती व स्मृतिदिनी कामगार हिताचे कार्यक्रम होणे गरजेचे असून ते होत नाहीत , कामगारांना अनेक त्रासातून मुक्ती देण्याचे काम रावबहादूर यांनी केलेले आहे महिलांना १३ तास तर पुरुषांना १८ तास काम करावे लागत होते तसेच बालमजुरी पण होत होती. पण त्यावर ती बंदी सुद्धा त्यांनी घातली तत्कालीन परिस्थितीमध्ये जातीय दंगली होत असताना ब्रिटिश सरकारने लोखंडे यांच्यावर जबाबदारी देऊन त्या दंगली थांबवण्यात आल्या.
अरुण गराडे म्हणाले की युरोपमध्ये 1750 मध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली आणि त्यानंतर भारतामध्ये रावबहादूर यांनी कामगारांना दिशा दिली. सुरुवातीला कापड गिरणीत काम केले केवळ ४८ वर्षाचे आयुष्य लाभले आणि प्लेगमुळे मृत्यू झाला अन्यथा कामगारांच्या हिताचा अनेक काम पुढे गेले असते.
भारती म्हणाले की कामगारांसाठी झटणारे ठराविकच महापुरुष होऊन गेले त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हे उल्लेख करावा लागेल मजूर मंत्री असताना त्यांनी कामगार हिताचे कायदे केले. आता समाजात निरंतर काम करणाऱ्या संघटनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. प्रस्तावना काशिनाथ नखाते यांनी केली आभार राजू बिराजदार यांनी मानले.


हेही वाचा :
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 172 जागांसाठी भरती, असा करा अर्ज
दक्षिण पूर्व कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत भरती, पदे – 800
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती, असा करा अर्ज
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती, असा करा अर्ज
डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत भरती, असा करा अर्ज
फार्मास्युटिकल्स आणि मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो ऑफ इंडिया अंतर्गत भरती
आयकर विभागात अंतर्गत भरती, असा करा अर्ज
ईगल्स आर्मी प्री-प्रायमरी स्कूल, खडकी, पुणे अंतर्गत भरती
कोल्हापूर येथे गट-ड पदाच्या विविध पदांसाठी अंतर्गत भरती, आजच करा अर्ज