Wednesday, February 12, 2025

PCMC:राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर(जिल्हा) आयोजित जिल्हास्तरीय डान्स स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्य शासनाने डान्स खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज-मेहबूब शेख

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) आयोजित शरद कला व क्रीडा महोत्सव जिल्हास्तरीय डान्स स्पर्धेस शहरातील तीनही विधानसभेतील नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.एकूण एक लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम आणि पारितोषिके देण्यात आली.सदर स्पर्धा ग्रुप डान्स व सोलो डान्स या प्रकारात घेण्यात आली.ग्रुप डान्स प्रकारात जी एन डी ग्रुप यांनी प्रथम क्रमांक,टीम डान्सहूड ग्रुप यांनी द्वितीय क्रमांक,तृतीय क्रमांक- डी डब्ल्यू एम क्र्यू ग्रुप आणि उत्तेजनार्थ क्रमांक- गेम चेंजर ग्रुप यांनी पटकावला.तर सोलो डान्स या प्रकारात नावे प्रथम क्रमांक प्रदीप गुप्ता,द्वितीय क्रमांक साजन तमांग,तर तृतीय क्रमांक इशिता बरवडे,उत्तेजनार्थ क्रमांक -रोहन उंबारे,यांना मिळाला.

यावेळी आयोजकांच्या वतीने सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या हस्ते या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ पार पडले.


यावेळी बोलताना मेहबूब शेख म्हणाले,”पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसने डान्स स्पर्धा आयोजित करून शहरातील अनेक नृत्य कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले याचा मला अभिमान वाटतो.नृत्य कलाकारांच्या अथक परिश्रम बघता राज्य शासनाने नृत्य कलाकार यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे अशी अपेक्षा व्यक्त केली.
महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे संभाव्य उमेदवार शिवसेना नेते संजोग वाघेरे यांनी आवर्जून उपस्थिती लावत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या टीमचे कौतुक केले.


इम्रान शेख म्हणाले,”पिंपरी चिंचवड शहरातील नृत्य कलाकारांची संख्या लक्षणीय असून महापालिकेने खेळाडू दत्तक योजनेत नृत्य स्पर्धकांना सहभागी करून द्यावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.”

यावेळी बोलताना सुनील गव्हाणे म्हणाले.”पवार साहेबांच्या कार्यकर्तृत्वामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या औद्योगीकरणाची भरभराट झाली. पुढे उद्योगनगरीची आयटीनगरी करण्याचं काम देखील आदरणीय पवार साहेबांनीच केलं. ही नगरी आता स्वतःची ओळख सांस्कृतिक नगरी म्हणून करू पाहत आहे.कामगार नगरी ते सांस्कृतिक नगरी या वाटचालीत शरद पवार यांचे योगदान अनन्य साधारण आहे.गेल्या पाच वर्षांमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र या शहरात फक्त टक्केवारी खाण्याचे काम केले हे दुर्दैव आहे.

या स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून अक्षय ढेरे,प्रेरणा साळवी,भाग्यश्री जाधव यांनी काम पाहिले तर साई काळे व राष्ट्रवादी युवक काँग्रेस टीमने या कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने केले.

यावेळी माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तात्या तापकीर,राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश मस्के,महिला शहराध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर,प्रदेश संघटक राहुल पवार,
युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर, कामगार नेते काशिनाथ नखाते,भोसरी विधानसभा अध्यक्ष एडवोकेट संतोष शिंदे,पुणे शहर युवक अध्यक्ष किशोर भाऊ कांबळे, औरंगाबाद संभाजीनगर जिल्हा कार्याध्यक्ष फारुख भाई शेख, सचिन निंबाळकर,पुणे शहर युवती पदाधिकारी भक्ती कुंभार,पायल चव्हाण,तसेच पिंपरी चिंचवड शहरातील माजी उपमहापौर विश्रांती पाडळे, महिला पदाधिकारी रेखा मोरे,स्वप्नाली असोले शोभाताई साठे,अंजना गायकवाड,राजेंद्र हरगुडे, बंडू माळी,अनिल भोसले, नितीन मोरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी विकास कांबळे, मेघराज लोखंडे, मयूर थोरवे, अमोल माळी, ऋषिकेश गारडे, निलेश निकाळजे, हाजी मलंग शेख,साहिल वाघमारे,शाहिद शेख,आश्रफ शेख, साहिल शिंदे मयूर खरात, पियूष अंकुश, रजनीकांत गायकवाड, नितीन शिंदे आणि मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

- Advertisement -

Latest Articles