पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मोशी बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी या परिसरात अनेक महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. या भागातील अनेक नागरिक रोज सारथी हेल्पलाईनवर तक्रारी करत असून त्या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही न करता तक्रार अधिकाऱ्यांकडून बंद केली जात असल्याचे समोर आले आहे. (PCMC)
मागील काही दिवसांत व १४ सप्टेंबरला क्रिस्टल सिटी सोसायटी समोर एका ४ वर्षाच्या मुलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे मुलगी बचावली. यापूर्वी बोऱ्हाडेवाडी भागात भटक्या कुत्र्याने चावा घेण्याच्या दोन ते तीन घटना घडल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिक, महिला व कामगार भटक्या कुत्र्यांच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. रात्री कामावरून घरी परतताना अनेक कामगारांचा कुत्री पाठलाग करत आहेत. अनेक कुत्र्यांची नसबंदी झालेली नाही तसेच ज्या कुत्र्यांची नसबंदी झालेली आहे त्यांना योग्य परिसरात सोडले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. (PCMC)
सारथी हेल्पलाईनवर मी तब्बल चार वेळा तक्रार केली. हा माझा टोकण क्रमांक ४१३६० आहे. पाचव्यादा ही तक्रार बंद केल्याचा मेसेज आला आहे. या समस्येसाठी साखळी उपोषण सुरू केले आहे.
ज्ञानेश्वर बोऱ्हाडे, स्थानिक नागरिक
भटक्या कुत्र्यांची नसबंदीचे काम सुरूच आहे. या श्वानांसाठी आपले वाहन रोज फिरत असते. ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांना संपर्क करण्यासाठी सांगा.
संदीप खोत, उपायुक्त, महानगरपालिका