Sunday, December 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : आमदार महेश लांडगे मागासवर्गीय समाजाच्या पाठीशी ‘भक्कम’; विधान परिषदेचे आमदार...

PCMC : आमदार महेश लांडगे मागासवर्गीय समाजाच्या पाठीशी ‘भक्कम’; विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांची भावना

मांतग समाजाच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – भारतातील सर्वांत मोठे संविधान भवन उभारण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मोठी मानवंदना आहे. महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी निगडी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बांधण्याचे कार्य हाती घेतली आणि पूर्णही झाले. यासह दरवर्षी अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाला मनपाकडून मोठे अनुदान देण्यासाठी आमदार लांडगे यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे मागासवर्गीय समाजाच्या पाठीशी ते भक्कमपणे आहेत, असे मत विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केले. (PCMC)


भोसरी विधान सभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांचे हात बळकट करण्यासाठी भोसरी विधानसभेतील मातंग तथा मागासवर्गीय प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक भोसरी मतदार संघमध्ये पार पडली. यामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातील ४०० पेक्षाजास्त मागासवर्गीय समाजातील मुख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मांतग समाजाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आढागळे, संदिपान झोंबाडे, बापू घोलप, डॉ. धनंजय भिसे, नितीन घोलप, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, कीर्ती जाधव आदी उपस्थित होते.

आमदार गोरखे म्हणाले की, भोसरी मतदारसंघातील अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आमदार महेश लांडगे यांच्यामुळे ‘आरटीई’ च्या माध्यमातून मोफत प्रवेश दिलेले आहेत. मागासवर्गीयांसाठी घरे असतील किंवा घरकुल शहर योजनेतील घरे असतील हे मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आमदार महेश लांडगे यांचे विधानसभा सभागृहातील कार्य अतुलनीय आहे. मी आमदार होत असताना त्यांनी मला केलेले हक्काने मतदान हे मातंग समाज कधीही विसरणार नाही.

कार्यक्रमाचे आयोजन मारुती जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन अरुण जोगदंड यांनी केले. आभार युवराज दाखले यांनी मांनले.

महायुतीचा विचार… मातंग समाजाच्या हिताचा…

महायुतीच्या माध्यमातून मातंग तथा मागासवर्गीय समाजाला नुकतेच घरकुल बांधणीचे अनुदान दीड लाखाहून अडीच लाखापर्यंत करण्यात आले. यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनमधील घर असेल किंवा पुण्यातील लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक असेल. बार्टीच्या धर्तीवर आरटीची निर्मिती असेल. अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईतील स्मारक असेल, अशा अनेक मागासवर्गीय जनतेसाठी विधायक निर्णय महायुती सरकारने घेतले आहेत. त्यामुळे संपूर्ण मागासवर्गीय समाज महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या सोबत राहील. त्यांच्या विजयामध्ये निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वासही आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय