पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक आघाडीचे अध्यक्ष मेघराज लोखंडे यांनी चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. PCMC
राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, मेहबूब रा.यु.काँ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि इम्रान शेख युवक शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर यांच्या मान्यतेने मेघराज लोखंडे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. PCMC
मेघराज लोखंडे यांचा शहरातील युवक व सामाजिक क्षेत्रातील लोकसंपर्क दांडगा असून त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षास होणार आहे
मेघराज लोखंडे म्हणाले, शिवराय,महात्मा फुले, शाहू आंबेडकर विचारधारेला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या पदाच्या माध्यमातून मी करेन व पक्षाची प्रतिमा व शक्ती वाढविण्यासाठी काम करेन तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघातील नागरी प्रश्न आणि तळागाळातील सामान्य माणसाच्या समस्यांचे निराकारण करण्यासाठी विद्यार्थी युवक यांना संघटित करून पक्ष बळकट करणे ही माझी जबाबदारी पूर्ण करेन. PCMC
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : मेघराज लोखंडे यांची चिंचवड विधानसभा अध्यक्ष पदी नियुक्ती
---Advertisement---
- Advertisement -