पिंपरी चिंचवड – स्तन कर्करोगाच्या जनजागृती साठी दि 23 मार्च रोजी पिं.चिंचवड शहरात भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन दि 23 मार्चला (रविवारी) 2025 रोजी, सकाळी ४:३० वा आकुर्डीच्या डॉ डी वाय पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्स होईल. (PCMC)
रन फॉर क्यूअर मॅरेथॉनच्या नोंदणीची अंतिम तारीख 17 मार्च 2025 आहे ,अशी माहिती आकुर्डी येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी मालती यांनी दिली.
मॅरेथॉनचे आयोजन डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आकुर्डी, रोट्रॅक्ट डी वाय पी सी ओ इ, सतेज स्पोर्ट क्लब, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने केले आहे. (PCMC)
गट : 10 किमी , 5 किमी, आणि 3 किमी या गटात धावतील
सहभागी होण्यासाठी नोंदणीची लिंक: https://www.rotaractdypcoe.org/marathon
PCMC : स्तन कर्करोग जनजागृतीसाठी मॅरेथॉनचे आयोजन
- Advertisement -