पिंपरी चिंचवड : क्रांतिकुमार कडुलकर : भा.ज.पा.सांस्कृतिक प्रकोष्ठ च्या वतीने विजय भिसे यांच्या पुढाकाराने मराठी भाषा दिवस पिंपळे सौदागर येथे उत्साहात पार पडला .
ज्येष्ठ कादंबरीकार ना.सी .फडके यांच्या कन्या लेखिका गीतांजली जोशी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली .उपस्थित मान्यवरांनी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन केले .प्रस्ताविकात विजय भिसे यांनी कार्यक्रमाचे उद्दीष्ट विशद केले.
याप्रसंगी नगरसेविका निर्मला कुटे,पिंपळे सौदागर येथील भानुदास काटे पाटील,उन्नती फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे,प्रेरणा बँकेच्या संचालिका चंदा भिसे,उद्योजक संजय भिसे,प्रकोष्ठचे उपाध्यक्ष विश्वनाथ अवघडे,सचिव सुनील थोरात,सामाजिक कार्यकर्ते,सुरेश काटे,बाळासाहेब काट,विजय काटे,पोपट काटे,अरुण चाबूकस्वार,सांगळे साहेब आदींनी प्रतिमा पूजन केले.
लेखिका गीतांजली जोशी यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वांना विस्तृत मार्गदर्शन केले . स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश बालवडकर यांनी कवी कुसुमाग्रज नावाची उकल करून श्रोत्यांना वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या बद्दलची माहिती विशद केली,त्यांच्या नावाने अवकाशातील ताऱ्याला नाव दिल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली .
इतर मान्यवरांमध्ये एच ए कंपनीतील कामगार नेते सरचिटणीस विजय पाटील यांनी देखील मराठी भाषेबद्दल मौलिक मार्गदर्शन केले.कवी संजय देशमुख,सामाजिक कार्यकर्ते संग्राम चव्हाण आदींची यावेळी भाषणे झाली,
दरम्यान बेल्लारी यांच्या स्नेहदीप या पुस्तकाचे प्रकाशनही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये संदीप बालवडकर,हनुमंत बालवडकर,बालवाडीचे मा.पोलिस पाटील श्री.कांबळेसाहेब,पिंपळे सौदागरचे समस्थ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,शाम कुंजीर यांनी सूत्रसंचालन केले .विश्वनाथ अवघडे यांनी सर्वांचे आभार मानले .