पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपळे गुरव (PCMC) येथील ममता अंधः कल्याण केंद्रात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षणासाठी आलेल्या 40 विशेष मुलांना स्नेहभोजन देऊन त्यांचा आनंद द्धिगुणीत केला सर्व मुलांनी आपापल्याला भविष्य काय व्हायचे आहे असे मनोगतातून सांगितले काही मुलांनी वेगवेगळ्या सिने कलाकार, राजकीय व्यक्तींचे आवाजातून आपली कला सादर केली, तर काही मुलांनी चित्रपटातील गाणी गायली.
यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मारुती मोहिते म्हणाले की, मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला खूप आनंद झाला आपल्याला परमेश्वराने सर्व काही देऊनही आपण समाधान नसतो आणि मला या मुलातच देव असल्याचे दिसले असे मोहिते यांनी सांगितले. PCMC NEWS
मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले कि आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्य भावनेतून शहरातील दानशूरांनी अशा गरजूवंत संस्थांना मदत केली पाहिजे.
संस्थेचे संस्थापक तुषार कांबळे म्हणाले की, येणाऱ्या दानशुरांना दीर्घायुष्य मिळावे, म्हणून आमची मुले प्रार्थना करतात आणि मुले खूप हुशार आहेत आणि आम्हालाही येथे सहकार्य करतात, वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या पदावर आमची मुले कार्यरत आहेत याचा मला सार्थ अभिमान वाटतो यातच माझ्या श्रमाचे सार्थक झाल्याचे तुषार कांबळे यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते भरत शिंदे म्हणाले की सामाजिक बाधिलकीतून कांबळे ममता अंधः कल्याण केंद्र चालवतात हे केंद्र चालवणे एवढे सोपे काम राहीलेले नाही आणि आधुनिक काळात दानशूरांची सख्या कमी होत चालली आहे .हे अवघड व जिकरीचे काम कांबळे कुटुंब करत असल्याने त्याचे कौतुक त्यांनी केले.
यावेळी ममता अंधः कल्याण केंद्राचे संस्थापक तुषार कांबळे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मारुती मोहिते, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे संचालक भरत शिंदे ,मानवी हक्क संरक्षण जागृतीच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, पृथ्वीराज मोहिते, राजलक्ष्मी मोहिते, राजवर्धन मोहिते, राजनंदिनी मोहिते इत्यादी उपस्थित होते. PCMC NEWS
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : ममता अंधः कल्याण केंद्रातील मुलांना सामाजिक मोहीते कुटुंबाचे स्नेहभोजन
---Advertisement---
- Advertisement -