पिंपरी चिंचवड – समाज परिवर्तनासाठी रचनात्मक कार्य आणि रचनात्मक कार्यासाठी समाज परिवर्तन ज्यांनी अपरिहार्य मानले ते ज्योतिबा महाराष्ट्र समाजाला वर्गीय जाणीव आणि वर्गीय दृष्टी देण्याचे काम करत आपल्या साहित्यातून जातिभेद अनिष्ट प्रथा तसेच विशिष्ट वर्गाची मक्तेदारी याविरुद्ध बंड करत समाजाला परिवर्तनाची दिशा दिली. महात्मा फुले हे खरे समाजशिक्षक होते असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. (PCMC)
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज थरमॅक्स चौक चिंचवड येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, संघटक अनिल बारवकर,अशोक जाधव, मनपा सदस्य सलीम डांगे,किशोर सरवदे,रोहन मुरगुंड,संजय भोसले, सचिन मुरगुंड, अविनाश मानवतकर, बायडाबाई केदारी, मंगल गायकवाड,
स्वप्नाली शिंदे,अरमान पठाण, सावित्री बिरादार, लावण्या शिरोळे, पिंकीदेवी शर्मा, शीतल मोरे,सुनीता डिघोळे, वंदना राठोड आदीसह कामगार उपस्थित होते. (PCMC)
महात्मा फुले यांनी क्रांतीवादी विचारसरणीचा पाया घातला कष्टकरी वर्गाच्या आर्थिक वाईट स्थितीचे चित्र त्यांनी लिखाणात मांडले शेतकरी हा भारतीय समाजातील सर्वात महत्वपूर्ण असा उत्पादक गट असल्याचे त्यांनी दाखवून दिले सामाजिक आर्थिक समतेवर आधारलेला शोषण विरहित असा समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी शोधून काढून त्यांच्यावरील पहिला पोवाडा लिहिण्याचे ऐतिहासिक काम महात्मा फुले यांनी केले असे महात्मा आपल्याला नेहमीच स्मरणात राहतील त्यांच्या जयंतीदिनी विविध उपक्रम करणे आपले कर्तव्य आहे.
प्रस्तावना महादेव गायकवाड यांनी केली तर आभार सुरेश देडे यांनी मानले.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : महात्मा फुले हे समाजशिक्षक होते – काशिनाथ नखाते
---Advertisement---
- Advertisement -