Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : महात्मा फुले हे त्याग, आदर्शाचे मूर्तिमंत उदाहरण आहे – संजोग वाघेरे पाटील

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना उमेदवार वाघेरे पाटलांकडून विनम्र अभिवादन !

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : सामाजिक सुधारणा आणि समतेचा विचार रुजविणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले त्याग, आदर्श, साहस ह्यांचे मूर्तिमंत उदाहरण आहेत, असे प्रतिपादन मावळ लोकसभेचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी केले.

थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मावळ लोकसभा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरीतील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील,(Sanjog Waghere Patil) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत-धर, इंजि. देवेंद्र तायडे, विशाल जाधव, सागर चिंचवडे, मयूर जाधव, जयंत शिंदे, काशिनाथ जगताप, माधव पाटील, योगेश सोनवणे, गणेश काळे, संजय पडवळ, हनुमंत वाबळे, अजय पिल्ले, के डी वाघमारे, अधिकराव चव्हाण, विवेक विधाते, सुशांत खुरासने, दिलीप पानसरे, संगीता खरात, पल्लवी कांबळे, दिपाली मुरकुटे, दीपक गायकवाड, बिभीषण कदम, डॉ. काशिनाथ बामणे, श्रीकांत पवार, प्रतीक जम, अमर भोसले, प्रल्हाद कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. pcmc news

संजोग वाघेरे पाटील पुढे म्हणाले, थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा फुले ह्या स्वाभिमानी नेत्याने देशाच्या सामाजिक जीवनात अशी उलथापालथ घडवली की त्याची दखल इतिहासाला घ्यावी लागली. त्याग, आदर्श, साहस ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा फुले. त्यांना दिन दुबळ्यांचा कैवारी म्हणून हि संबोधले जाते. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम त्यांनी केले. त्याच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या ज्योतिबांना (mahatma fule) शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महात्म्यास शत शत वंदन करून उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या. pcmc news

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles