Thursday, October 24, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:महासाधू श्री मोरया गोसावी समाधी मंदिर व परीसरात ‘स्वच्छ तीर्थ’ हे अभियान...

PCMC:महासाधू श्री मोरया गोसावी समाधी मंदिर व परीसरात ‘स्वच्छ तीर्थ’ हे अभियान संपन्न

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: श्री प्रभु रामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा व श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘श्रीरामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठे’ पूर्वी देशातील सर्व मंदिर व तीर्थक्षेत्र परिसरामध्ये ‘स्वच्छ तीर्थ’ हे अभियान राबवावे असे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहानाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महानगरपालिका,चिंचवड देवस्थान ट्रस्ट व नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ तीर्थ’ अभियाना अंतर्गत श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी समाधी मंदिर व परीसरात शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजता ‘स्वच्छ तीर्थ’ अभियानाचे आयोजित करण्यात आले होते.


या ‘स्वच्छ तीर्थ’ अभियानात मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे,आमदार उमा खापरे,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सदस्य प्रकाश मीठभाकरे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव,माजी नगरसेवक व नाट्य परीषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर,माजी नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते,शत्रुघ्न बापू काटे, बाळासाहेब ओव्हाळ,संदिप कस्पटे,शैलेश मोरे,माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संजय मंगोडेकर, अजय पाताडे,अभाविपचा प्रांत सहमंत्री श्रेया चंदेल,अतिरीक्त आयुक्त विजय खोराटे,मुख्य वैद्यकिय अधिकारी डॅा.गोफणे, सहाय्यक आयुक्त डॅा.यशवंत डांगे,आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे,ब प्रभाग क्षेत्रिय अधिकारी अमित पंडीत, भाजयुमो प्रदेश सचिव अजित कुलथे,अभाविपचे शहर मंत्री सिद्धेश्वर लाड,भाजपा शहर उपाध्यक्ष विनोद मालू,भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे, भाजयुमो शहर सरचिटणीस शिवम डांगे,स्वप्निल देव, विवेकानंद केंद्राच्या अरूणा मराठे,महिलांचे व्यासपीठ प्रयास ग्रुपच्या शोभाताई निसळ,माधुरी कवी,चंद्रकलाताई शेडगे, फ्रेंडस् अॅाफ बीजेपीचे विधानसभा संयोजक रविंद्र प्रभुणे, सांस्कृतिक आघाडीचे माजी अध्यक्ष धनंजय शाळीग्राम, ओबीसी आघाडीचे प्रदिप सायकर,प्रशांत आगज्ञान, सामाजिक कार्यकर्ते नारायण लांडगे,दिपक आण्णा गावडे, निरंजन देव,महेश मिरजकर, मयुर देव यांनी सहभाग घेतला.


अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या ‘स्वच्छ तीर्थ’ अभियानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी,अखिल भारतीय विद्यार्थी परीषद,विश्व हिंदू परीषद,चिंचवड ग्रामस्थ,प्रयास महिला ग्रुप,महिला बचत गट, विवेकानंद केंद्र या विविध संघटनेचे पदाधिकारी सदस्यांसह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
त्याचबरोबर चिंचवडकर नागरिकांनी देखिल अभियानास प्रचंड प्रतिसाद देत उस्फुर्तपणे सहभाग घेतला.माजी नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी या अभियानाचे आयोजन केले होते.

संबंधित लेख

लोकप्रिय