पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – एक मे हा जागतिक कामगार दिन म्हणजेच श्रमिक दिन म्हणून जगातील 80 देशांमध्ये कामगार दिन म्हणून पाळला जातो. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, संत तुकारामनगरच्या वतीने जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन महाराष्ट्र गित व शहीदांना श्रद्धांजली देऊन साजरा करण्यात आला. (PCMC)
ज्येष्ठ साहित्यिक कामगार नेते अरुण बोराडे म्हणाले की, आजही कामगाच्या बऱ्याचशा संघटना मालक शाहीच्या दावणीला बांधलेल्या आहेत, तर फारच थोड्या कामगार संघटना प्रामाणिक पणे काम करतांना दिसतात, कामगार देशोधडीला लागला आहे सर्व कायदे उद्योग धार्जिणे झाल्याची खंत बोराडे यांनी व्यक्त केली.

नारायण लोखंडे यांनी साप्ताहिक सुट्टी दिली, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 106 जणांनी आहुती दिली, याचे स्मरण केले पाहिजे आणि कोयना धरणासाठी मंजुरी आणण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले यांचे योगदान विसरून चालता येणार नाही असे कामगार नेते अरूण बाराडे यांनी म्हटले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदाम मोरे म्हणाले की, पिंपरी चिंचवड ही गुणवंत कामगाराची खान आहे सध्या गुणवंत कामगार विखुरलेला आहे अशी खंत व्यक्त केली पुढे ते म्हणाले की, कामगारांमधून एक गुणवंत कामगार विधानसभेवर आमदार म्हणून गेला पाहिजे जसे पदवीधर व शिक्षकांमधून एक आमदार निवडला जातो त्याप्रमाणे गुणवंत कामगारांमधून आमदार निवडला पाहिजे, म्हणजेच कामगाराची व्यथा त्या ठिकाणी मांडू शकेल आणि खरा न्याय तोच देऊ शकेल असे मत व्यक्त केले. (PCMC)
कामगार प्रतिनिधी किरण देशमुख म्हणाले कि, अजूनही आपण श्रमाला योग्य मोबदला देऊ शकत नाही. प्राथमिक मानवी गरजा रोटी, कपडा और मकान आहेत याच गरजांची पूर्तता व्हावी म्हणून श्रमिक कामगार घाम गाळतो. त्यांच्या श्रमाला योग्य मोबदला देण्याचे काम शासन आणि कामगार संघटनांचे आहे. (PCMC)
यावेळी आण्णा जोगदंड म्हणाले की कोणतेही काम हे लहान मोठे नसते कामाप्रती प्रामाणिकपणा असावा त्यातच कामगारांचे हित आहे .रूपमय चटर्जी यांनी पश्चिम बंगाल मधून येऊन कामगार हिताचे जे कार्य केले आहे याची तुलना आपणाला कशातही करता येणार नाहीत कामगार हितासाठी चटर्जी सारख्या कामगार नेत्याची देशाला आज गरज असल्याचे जोगदंड यांनी सांगितले.
यावेळी केंद्र संचालक अनिल कारळे,कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदाम मोरे, प्रमुख पाहूने किरण देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक, कामगार नेते, वक्ते अरुण बोराडे, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, गुणवंत कामगार संगिता जोगदंड, राष्ट्रीय लोक अदालतचे न्यायाधीश अँड. रमेश उमरगे, कामगार प्रतिनिधी विजय पाटील तसेच भूजल संरक्षण अधिकारी भूजल सर्वेक्षण अधिकारी डी.आर.वारे,मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे सचिव गजानन धाराशिवकर, गुणवंत कामगार यादव तळोले, गोरख वाघमारे, ह.भ.प.शामराव गायकवाड,जेष्ट पत्रकार शिवाजीराव शिर्के, कवी शामराव सरकाळे, सुरेखा मोरे, संगिता क्षिरसागर, शैलेजा आवाडे, प्रतिभा मरळ, किरण कोळेकर, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचालन व आभार केंद्रसंचालक अनिल कारळे यांनी मानले.