Friday, June 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे.

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ पदाधिकारी व मनपा समिती सदस्यांनी आयुक्तांची घेतली भेट.

---Advertisement---

पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड शहरातील पत विक्रेत्यांचे सन २०२२ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. ठेकेदाराच्या चुकांमुळे दोन वर्षे विलंब झाला, आता प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहेत तर काही ठिकाणी हे थांबवण्यात आलेले आहे . फेरीवाला प्रमाणपत्र त्वरित वाटपास सुरुवात करण्यात यावी तसेच फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्वरित बैठकीचे आयोजन करण्यात करावे या मागणीसह कामगार नेते काशिनाथ नखाते यांचेसह शहर पथ विक्रेता समिती सदस्यांनी आज समितीचे अध्यक्ष आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. (PCMC)

पिंपरी चिंचवड शहरातील १५ हजार विक्रेत्यांपैकी ८ हजारापेक्षा अधिक विक्रेत्यानी ओळखपत्र व परवाना शुल्क १४०० रुपये प्रमाणे भरले आहेत मात्र केवळ किरकोळ विक्रेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत. वास्तविक महानगरपालिका कर्मचारी , अधिकारी हे प्रमाणपत्राचे वाटप करणे अपेक्षित आहे मात्र तसे न करता ठेकेदार भ्रष्टाचार करून बोगस लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करत आहेत हे अत्यंत चुकीचे असून मूळ विक्रेत्यावर अन्याय होत आहे. ज्यांनी १४०० रुपये भरलेत अशां खऱ्या विक्रेत्यांना प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावे.

मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश, समितीच्या सदस्यांना कामकाजासाठी कार्यालयाची उपलब्धता करून देण्यात यावी व प्रभाग स्तरावरती हॉकर झोनच्या अंमलबजावणीसाठी त्वरित कार्यवाही सुरू करून कशा पद्धतीने नियोजन करता येईल यासह अशा मागण्यावर चर्चा करण्यात आली यावेळी आयुक्त यांनी फेरीवाल्यांच्या या मागण्यावरती साधक – बाधक चर्चा करण्यासाठी व त्यांना लाभ देण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करू असे आश्वासन आज दिले. (PCMC)

नॅशनल हॉकर फेडरेशन,महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते,मनपा सदस्य किरण साडेकर, किसन भोसले, सलीम डांगे, राजू बिराजदार, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, सुनील भोसले, संभाजी वाघमारे यांचा बैठकीत समावेश होता.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles