पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महाराष्ट्रात बेरोजगारीचा दर 5.5 टक्के इतका आहे. उत्तरेतील राज्यांची तुलना करता हा दर कमी असला तरी महाराष्ट्राच्या शेजारील गुजरात आणि कर्नाटकापेक्षा राज्यात बेरोजगारी जास्त असल्याचे दिसत आहे. गुजरातमध्ये दर 2.4 टक्के आहे तर कर्नाटकात 3.4 टक्के आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास मागच्या वर्षीच्या तुलनेत जानेवारीचा (unemployment ) दर सर्वाधिक आहे.
महाराष्ट्रात मागच्या तिमाहीत बेरोजगारीचा दर चार टक्क्यांच्या वर गेला नव्हता. मात्र 2023 च्या पहिल्याच महिन्यात बेरोजगारी वाढल्याचे चित्र दिसत आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) युवा आघाडीचे पिंपरी चिंचवड (pcmc) अध्यक्ष इम्रान शेख यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना सांगितले. pcmc news
महाराष्ट्रात बेरोजगारीचे वास्तव
महाराष्ट्रात बेरोजगारी व अर्धरोजगार किंवा अपुरा रोजगार मिळणे ही समस्या मोठी आहे. सरकारी आस्थापनांमधील पदे भरलेली नाहीत. अनेक सरकारी विभागात खाजगीकरण झाले आहे. खाजगी उद्योगात कमी मनुष्यबळामधे आस्थापना, उद्योग चालवणे सुरू आहे. ख-या अर्थाने रोजगाराभिमुख धोरण आखले जात नाही. घोषणा खूप होतात. त्या घोषणांचे राजकारण खूप केले जाते. प्रत्यक्ष रोजगार वृध्दी मागील दहा वर्षात कमी आहे. pcmc news
महाराष्ट्रात शेतकरी, मच्छिमार, पशुपालन करणारे,आदिवासी असे समूह त्यांची जगण्याची साधने हिरावली जात आहेत, विकासाच्या नावाखाली, विकास प्रकल्पांमधे जमीन संपादन, पाणी व जंगले खाजगी कंपन्यांना मक्तेदारीने देणे या सा-या प्रकारात जे रोजगार व उपजीविका गमावतात, त्यामुळे वाढणारी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. आणि असे जेवढे रोजगार संपवले जातात त्या तुलनेत रोजगारनिर्मिती होत नाही. आज कामगारांची एकूण संख्या असंघटित क्षेत्रात ९० टक्के आहे, मात्र नवीन उद्योग येणे बंद झाले आहे.pcmc news
गेली मागील दशकात राज्यात तरुणांचा मोठा उद्रेक वाढत आहे, ही सामाजिक समस्या सतावतेय. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रोजगाराच्या पुरेशा संधी मिळत नाहीत. गावात असलेले कुटीर उद्योग, लघु उद्योग आणि शेतीशी संबंधित उद्योग अलीकडच्या काळात कमी झाले आहेत,शेतमालाला भाव मिळत नाही, त्यामुळे बागायती जिरायती कोरडवाहू शेतकऱ्यांची मुले शेती करत नाहीत.
यातून १८ ते ३५ वयोगटातील तरुण मुले मुली ग्रामीण भागातून शहरी उद्योगात कंत्राटी मजूर आणि तेही अल्प वेतनात राबवले जात आहेत. यातील 98% लोक असंघटित क्षेत्रात किंवा निवृत्तीवेतन, आरोग्यविमा यासारख्या सवलती पासून वंचित आहेत.
बेरोजगारीचे गंभीर सामाजिक परिणाम होऊ शकतात. असे आढळून आले आहे की बेरोजगार व्यक्ती ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या व्यसनास अधिक संवेदनाक्षम असतात आणि त्यांना मानसिक आरोग्य समस्या देखील येऊ शकतात, त्यामुळे राज्यातील उद्योगात नवीन गुंतवणूक, नवीन उद्योग यावेत, यासाठी सरकारने कोणतेही महाराष्ट्र स्नेही उद्योग धोरण राबवले नाही, सगळे उद्योग गुजरात, तामिळनाडू राज्यात का जात आहेत, यावर चर्चा करण्या ऐवजी येथील राज्यकर्ते दिल्ली कडे लक्ष, राज्याकडे दुर्लक्ष करून राहिले आहेत.
आमच्या राज्यातील बेरोजगार तरुण मुलामुलींच्या हाताला काम मिळण्यासाठी महाराष्ट्र दिनी व कामगार दिनी सुजाण राज्यकर्ते निवडून दिले पाहिजेत. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस युवा आघाडीचे अध्यक्ष इम्रान शेख यांनी सांगितले.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : महाराष्ट्र स्नेही उद्योग धोरण नाही, राज्यातील तरुणाला काम नाही – इम्रान शेख
---Advertisement---
- Advertisement -