Friday, March 28, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : जागतिक महिला दिनानिमित्त महाआरोग्य शिबिर

पिंपरी चिंचवड – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाच्या वतीने काळेवाडी ज्योतिबा मंगल कार्यालय येथे महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात महिलांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. (PCMC)

यामध्ये एच वि देसाई नेत्र रुग्णालय यांच्याकडून मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, एम ओ सी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर यांच्याकडून ब्रेस्ट कॅन्सर तपासणी आणि जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट फ्री देण्यात आले. (PCMC)

जनतेच्या मनातील भावी आमदार राहुल कलाटे यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

---Advertisement---


तसेच शारदा मुंडे, पक्षाचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, समन्वयक विवेक विधाते, सचिन निंबाळकर, उपाध्यक्ष रेखा मोरे, सुनंदा काळे, अलका कांबळे, संगीता अवधूते, युवक चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे पदाधिकारी उपस्थित होते.

काळेवाडी परिसरातील बहुतांश महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला कार्यक्रमाचे आयोजन उषा काळे व विजय काळे यांनी केले होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles