महाआरोग्य शिबिराचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे मयूर जाधव यांचे आवाहन ! (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांती कुमार कडुलकर : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मयूर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी श्री मयूर भरत जाधव मित्रपरिवार यांच्यावतीने ‘महाआरोग्य शिबिर सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. (PCMC)
तसेच या सप्ताहामध्ये नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती मयूर जाधव यांनी दिली.
सदर शिबिर सप्ताह येत्या शुक्रवार (दि. २७ सप्टेंबर २०२४ ते २ ऑक्टोबर २०२४) दरम्यान राबविण्यात येणार आहे. तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक प्रभागात सदर शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
यामध्ये नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात येतील. तसेच डोळे तपासणी, आरोग्य विषयक तपासणी तसेच औषधे वाटप करण्यात येणार असून, सदर शिबीर सप्ताह उद्या म्हणजेच २७ सप्टेंबर पासून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या दरम्यान सुरु राहणार आहे. तसेच सदर हे शिबीर उद्या शुक्रवारी दापोडी येथील नरवीर तान्हाजी मालसुरे स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे.
याबाबत मयूर जाधव म्हणाले, “पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आपण सदर महाआरोग्य शिबीर सप्ताह राबवित आहोत, पिंपरी मतदारसंघ हा शक्तिशाली घडवण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. या मतदारसंघातील कोणताही व्यक्ती वंचित राहू नये, तसेच आरोग्य विषयक कोणत्याही बाबी असो, आपण या शिबिरामार्फत सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. यासाठी अनेक तज्ञ् डॉक्टर सदर शिबिरात उपचार करणार आहे,
तरी पिंपरी मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,” असे आवाहन मयूर जाधव यांनी केले आहे.
मयूर जाधव हे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे ते अध्यक्ष आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुक आहेत.
ते या मतदारसंघात अनेक सामाजिक कार्य करीत राहतात. तसेच या मतदारसंघातील नागरिकांसाठी नेहमी पाठिंबा दर्शवितात. मयूर जाधव हे करत असेलेल्या कार्याचे नागरिक नेहमी कौतुक करतात. मयूर जाधव हे या मतदारसंघाच्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर देत असून, पुढील काळात नक्कीच पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा शक्तिशाली घडविणार, असे मत या मतदारसंघातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.