पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : सुभेदार रामजी आंबेडकर वाचनालय कार्यकारी संस्था, नवी सांगवी (pcmc) यांच्या विद्यमाने जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुनी तथागत गौतम बुद्ध यांच्या 2568 व्या जयंती निमित्त परिवर्तनवादि, विज्ञावादी, व समतेचा विचार पेरणाऱ्या सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, अहिल्या देवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संयुक्त जयंती महोत्सवातून विनम्र अभिवादन करण्यात आले. pcmc
विविध क्षेत्रातील मान्यवर समाज सेवकांचा गौरव करण्यात आला, यामध्ये अरुण पवार (वृक्षमित्र), विनायक बडदे (सर्पमित्र), यशोधरा नितनवरे, संतराम निकाळजे, विजय चौधरी, शिवानंद तालीकोटी यांचा भारतीय संविधानाची उद्देशिका भेट देऊन सन्मान करण्यात आला. pcmc
याप्रसंगी प्रकाश खुड़े, महेंद्र कदम, अॅड. वसंत जाधव, गौतम डोळस, सुरेंद्र जाधव, निखिल चव्हाण, गजानन कांबळे, मानसिंग कांबळे, उज्वला जाधव, भारती भालेराव, विजया सोंडे, इंदुमती पवार, सुरेखा कनवाळू, उषा शिंदे, शोभा सावंत, मिरा शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मगन सावंत, दिलीप शेलार, हनुमंत सोनावणे, सुनील जावळे, सिद्धार्थ मराडे, गुलाब गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी प्रा. महादेव रोकडे यांनी कविता सादर केली.
बुध्द त्यानेही वाचला.. आणि बुध्द
मी सुध्दा वाचला llll फरक मात्र एवढा ll तो बुध्दाला फक्त
शांतीचं प्रतीक समजतो
आणि मी क्रांतीचं llll बुध्द त्याच्याही घरात आहे ll आणि बुध्द माझ्याही घरात आहे फरक मात्र एवढा तो बुध्दाला फक्त डोळे मिटलेला समजतो आणि मी डोळस llll बुध्द त्याच्याही मनात आहे
आणि बुध्द माझ्याही मनात आहे. फरक मात्र एवढातो बुध्दाला फक्त
हिंसेच्या विरुध्द समजतो … हि कविता उपस्थितांची दाद देऊन गेली. Budhha Jayanti