राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाकडून जल्लोष साजरा (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : भारतातील लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल आज लागला यात महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा व संविधानाच्या बाजूने मतदान केले, हि विधानसभेच्या विजयाची नांदी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. pcmc news
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट युनियन फेडरेशन व असंघटित कामगार विभागाच्या वतीने आज चिंचवड येथील थरमॅक्स चौक येथे महाविकास आघाडीच्या विजयाचा जल्लोष लाडू वाटप करून, गुलाल उधळून करण्यात आला. pcmc
यावेळी प्रदेश सचिव तुषार घाटूळे,उपाध्यक्ष राजेश माने, युवा विभागाचे सुरज देशमाने,राजू बिराजदार, सामाजिक कार्यक्रम हौसराव शिंदे, बाळासाहेब बरगले, शिवसेनेचे शिवाजी साळवे, नाना कसबे, बालाजी लोखंडे, नाना क्षीरसागर,तुकाराम माने, फरीद शेख, मनोज यादव, सलीम डांगे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र मध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी अनेक सभा घेतल्या महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला मात्र जनतेने त्यांना नाकारलेल आहे रोजगाराच्या मुद्द्यावर महागाईच्या मुद्द्यावर त्याचबरोबर फोडाफोडीचा राजकारणावर जनतेने दिलेले हे उत्तर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी ८४ व्या वर्षीही न खचता लढले त्याचा करिष्मा दिसून आला त्यांच्यावर विश्वास जनतेने दाखवला आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी भविष्यात विधानसभेला मोठे संपादन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :
पुण्यातून मुरलीधर मोहोळ विजयी, तर धंगेकर आणि मोरेंना किती मते मिळाली पहा !
ब्रेकिंग : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दोन्ही मतदारसंघातून विजय
ब्रेकिंग : उत्तर मुंबईत वर्षा गायकवाड यांचा विजय, उज्वल निकम यांचा पराभव
ब्रेकिंग : मावळ लोकसभा मतदार संघात श्रीरंग बारणे यांचा विजय तर संजोग वाघिरे यांचा पराभव
मोठी बातमी : शिरूर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे यांचा मोठा विजय, आढळराव पाटील यांचा पराभव
मोठी बातमी : बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा विजय, अजित पवार यांना मोठा धक्का
ब्रेकिंग : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला प्रज्वल रेवन्ना यांचा पराभव
ब्रेकिंग : बारामतीसह अनेक जागांवर अजित पवार यांना मोठा धक्का
ब्रेकिंग : शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर तर आढळराव पाटील हे पिछाडीवर
ब्रेकिंग : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसंडी, 23 हजार मतांनी आघाडीवर
सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर
मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण