पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : लायन्स क्लब ऑफ पुणे मेट्रोपोलीस या सामाजिक संस्थेच्या वतीने चिंबळी (ता. खेड) येथील ओमशांती मुलींचे बालगॄह संस्थेला पिण्याच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी दीड एचपीची मोटर भेट देवून मदतीचा हात दिला. (pcmc)
या आश्रमात २५ अनाथ मुली वास्तव्यास आहे. पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती. मुलींना पाणी आणण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागत होता. यावर भारती पाटील यांनी दीड एच पी पाणी उपसा करण्यासाठी मोटरची मागणी केली. त्यासाठी ॲक्टिव्हिटी मॅन भरत इंगवले यांनी पुढाकार तर अर्थसाहाय्य अध्यक्ष शंकर गावडे यांनी केले. क्लबचे अध्यक्ष शंकर गावडे, रामचंद्र माने व लायन् भरत इंगवले यांनी बालगृहाच्या संचालिका भारती पाटील यांच्याकडे मोटार साहित्य सुपूर्द केले. मोटर भेट दिल्यामुळे मुलींना पिण्याचे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला. pcmc
मेट्रोपॉलिस या सामाजिक संस्थेच्या वतीने नित्य नियमाने समाजातील गोर गरिबांसाठी सेवा केली जाते.


हेही वाचा :
आज दहावीचा निकाल, असा पहा निकाल !
12वी च्या पुरवणी परिक्षेसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार!
दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी
ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू
इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?
खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण
मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली
मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क
पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक
ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती