Friday, March 28, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : लिफ्टमन संदीप यादव यांचे निधन

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील अंध कर्मचारी (लिफ्टमन) संदीप महादेव यादव (वय ५५ वर्षे) यांचे सोमवारी (दि.२४) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. यादव १९९८ मध्ये लिफ्टमन म्हणून चव्हाण रूग्णालयात रूजू झाले, ते २६ वर्षे कार्यरत राहिले. (PCMC)

---Advertisement---

नम्र व मनमिळाऊ स्वभाव, प्रामाणिकपणा आणि इतरांना कायम मदत करण्याची भावना यादव यांनी कायम जोपासली. सहाव्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती. तरीही ते खचून गेले नाही. अपंगत्वाचा कोणताही अडथळा न मानता त्यांनी भरपूर प्रगती केली. स्वतः अंध असूनही ते इतरांना सातत्याने मदत करत होते. अंधासाठी क्रिकेट सामने, यात्रा-सहल आयोजित करण्यासाठी ते पुढाकार घेत होते. सामाजिक कार्य करतानाच त्यांनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, पुणे यांच्याकडून उल्लेखनीय कार्याबद्दल यादव यांचा यथोचित सन्मान करण्यात आला होता. भोसरी विद्युत दाहिनी मध्ये सोमवारी अंत्यविधी करण्यात आला. (PCMC)

---Advertisement---

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व पालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा :

इन्फोसिस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; लवकरच होणार पगारवाढ

संतापजनक : स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरूणीवर बलात्काराची घटना, डेपोतील धक्कादायक गोष्टी समोर

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, अनेक वस्तू जप्त, १३ जण अटकेत

LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles