Thursday, October 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : रहाटणी येथे 'मूर्तिदान करूया, पर्यावरण जपूया' उपक्रम राबवला

PCMC : रहाटणी येथे ‘मूर्तिदान करूया, पर्यावरण जपूया’ उपक्रम राबवला

पिंपरी चिंचवड मनपा व गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ग प्रभाग येथे उपक्रम (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मनपा आरोग्य विभाग व गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने रहाटणीच्या घाटावर गणेश मूर्तीचे संकलन करण्यात आले.गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण म्हणाल्या, गणेशभक्त आपल्या घरी भक्तीभावाने गणेशाची पूजा करतात आणि ज्यावेळेस आमच्याकडे मुर्तीदान करण्यासाठी येतात. त्यावेळी मूर्ती स्वीकारताना आम्हाला खूप वाईट वाटते. कारण बाप्पाला निरोप देताना अनेक भाविक भावूक झालेले दिसले. (PCMC)

परत जाताना जड अंतकरणाने मागे वळून बघताना गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर बाप्पा निघाले गावाला चैन पडेना आम्हाला, या असे म्हणत भाविक मागे वळून बघत होते.

नदीमध्ये मूर्ती विसर्जित करू नका, कृत्रिम हौदात मूर्ती विसर्जन करून नदीपात्राचे प्रदूषण रोखू या अशी कळकळीची विनंती डॉ. भारती चव्हाण यांनी गणेशभक्तांना केली.

आम्ही एकाच दिवशी 300 एवढ्या मूर्तीचे संकलन केले असून गणेशाची विधीवत  पूजन करून योग्य त्या ठिकाणी विसर्जन केली जाईल.

नागरिकांनी पालिकेने 85 ठिकाणी मुर्तीदान व संकलन केंद्र उभारले आहे, त्याच ठिकाणी नागरिकांनी मुर्तीदान करून पर्यावरण पुरक गणोत्सव साजरा करण्याचे आवाहन ग प्रभाग वेळी ह प्रभाग मुख्य आरोग्य आधिकारी उद्धव ढवरी यांनी यावेळी सांगितले. प्लास्टिक  व निर्माल्य असे दोन वेगवेगळे बीन त्या ठिकाणी ठेवण्यात आल्याचे ढवरी यांनी सांगितले.

मनपा ग प्रभाग आरोग्य निरीक्षक उमेश कांबळे, मुर्तीसंकनामध्ये मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण, शहराध्यक्ष बशिर मुलानी, बाळासाहेब साळुंके, महेंद्र गायकवाड, राजेश हजारे, वाघमारे गोरखनाथ,आण्णा जोगदंड, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसेवक गोपळ माळेकर, तानाजी एकोंडे, शंकर नाणेकर  शिंदे भरत, नंदकुमार धुमाळ, ज्ञानेश्वर मलशेट्टी, अशोक सरतापे, इस्माईल मुल्ला, हनुमंत यादव, शिवाजी पाटील, रघुनाथ फेगडे, पालिकेच्या वतीने विनोद ताठे, मुकादम अरूण राऊत, रितेश स्वराज, पोलीस बांधव सागर काळे, नामदेव वडेकर,किरण कांबळे, अर्पणा कांबळे, शशीकांत कुंजीर इत्यादी कार्यकर्ते उपक्रम राबवित होते.

बशीर मुलानी, बाळासाहेब साळुंखे, महेंद्र गायकवाड, आण्णा जोगदंड यांनी उपक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

लोकप्रिय