राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शहर कार्याध्यक्ष देवेंद् तायडे, युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. (PCMC)
यावेळी बोलताना युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या, बाल विधवांना शिक्षण देणे, बालविवाह थांबवणे, सती प्रथेविरुद्ध लढा देणे आणि विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा देण्याचे कार्य केले.
त्यांनी भिडे वाडा येथे पहिली शाळा सुरू करून शिक्षणाशिवाय गरिबी हटणार नाही, बहुजन दुर्बल समाज सुधारणार नाही, यावर भर दिला. आपल्या राज्यात देशात, पिंपरी चिंचवड शहरात शिक्षणाचे खाजगीकरण झाल्यामुळे अल्प उत्पन्न गटातील होतकरू मुलामुलींना मराठीसह इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेणे परवडत नाही, शिक्षण हा धंदा आणि व्यवसाय झाला आहे.
किमान पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वतःच्या शाळांचे इंग्रजी सह संगणकीकरण आणि किमान विशेष सवलती देऊन स्वतःच्या शाळांची संख्या वार्ड प्रमाणे वाढवावी, तरच खऱ्या अर्थाने बहुजन हिताय बहुजन सुखाय आणि सावित्री बाई फुले यांच्या विचाराने आपण काम करू शकतो. तसेच राज्यसरकारने पदवी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण द्यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) युवक आघाडीचे अध्यक्ष इम्रान शेख यांनी प्रतिपादन केले.
गेल्या दोन वर्षापासून रखडेलेले सावित्रीमाईचे स्मारक लवकर लोकापर्ण करावे, अशी मागणी देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे करण्यात आली, यावेळी बोलताना देवेंद्र तायडे म्हणाले” क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले स्मारक मधील ग्रंथालय शहरातील वाचकासाठी लवकरात लवकर खुले करावे”. (PCMC)
यावेळी कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, शहर सरचिटणीस रजनीकांत गायकवाड, युवक सचिव मयूर खरात, शहर सचिव शाहिद शेख, साहिल वाघमारे, फहीम शेख, अर्श शेख, सागर वाघमारे, दिनेश गंगावणे आदी उपस्थित होते.