पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : समर्थ सोशल फौंडेशन कोल्हापूर या संस्थेचा दरवर्षी दिला जाणारा “राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत” पुरस्कार चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर अण्णासाहेब थोरात यांना नुकताच दिनांक २९ संप्टेंबर रोजी कोल्हापूर येथील सयाजी हॉटेल येथे देऊन सन्मानित करण्यात आले. (PCMC)
सदर पुरस्कार हा समर्थ सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, संचालक सागर देसाई, संचालक अस्लम शेख, संचालक सुहास पाटील व डॉ बाळ माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथील प्रख्यात हॉटेल सयाजी मध्ये सुमारे एक हजार लोकांच्या उपस्थितीत पार पडला तर किशोर थोरात यांच्याबरोबर त्यांच्या सौभाग्यवती सविता किशोर थोरात याही उपस्थित होत्या.
दर वर्षी हा पुरस्कार समर्थ सोशल फौंडेशन संस्थेबरोबर सामाजिक कार्य करून लाखो लोकांना व्यसनमुक्त व मधुमेहमुक्त करण्यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो तर या वर्षी हा पुरस्कार पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर थोरात यांना दिला गेला. (PCMC)
किशोर थोरात हे मागील दहा वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रात आपले उल्लेखनीय काम करत असून त्यांनी मधुमेह मुक्ती व व्यसनमुक्ती साठी उल्लेखनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
किशोर थोरात हे विविध संस्था मार्फत आपले सामाजिक काम करत असतात जसे की
आधार शैक्षणिक संस्था, पुणे(गरीब मुलांच्या शिक्षणाला मदत) : शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ (मानव अधिकार क्षेत्र,स्वामी समर्थ सेवा प्रचिती-(अध्यात्म) आणि
समर्थ सोशल फौंडेशन, कोल्हापूर (मधुमेहमुक्त आणि नशामुक्त भारत अभियान) अशा अनेक क्षेत्रात वेगवेगळ्या पदावर काम करून आपले योगदान समाजासाठी देत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले किशोर अण्णासाहेब थोरात यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी या अगोदरही विविध सामाजिक संस्थांकडून समाजरत्न २०२१, आदर्श समाजरत्न प्रेरणा २०२२, आयकॉन ऑफ आशिया २०२२, प्राईड ऑफ नेशन २०२२, आदर्श समाजभूषण प्रेरणा गौरव २०२२, स्टार इंडियन लीडर शिप अवॉर्ड २०२४,लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०२४ असे अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
तर यापुढेही असेच विविध क्षेत्रात आपले उल्लेखनीय काम निश्चितच चालू ठेऊन देशाच्या हितासाठी एक खारीचा वाटा म्हणून काम करत राहणार असल्याचे आणि पुरस्कार हे प्रेरणा देतात व त्याचे फळ नक्कीच सेवेतून मिळत असल्याचे किशोर थोरात यांनी सांगितले.
समर्थ सोशल फौंडेशन कोल्हापूर या संस्थेचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल किशोर थोरात यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली व म्हणाले की पुरस्कार हा माझ्या बरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांचा सन्मान आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल किशोर थोरात यांनी समर्थ सोशल फौंडेशन कोल्हापूर या संस्थेचे अध्यक्ष, संचालक व संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणजेच रफिक सय्यद आणि महेंद्र शेळके यांचेही मनापासून आभार मानले.
किशोर थोरात यांना व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती या क्षेत्रातील हा पहिलाच पुरस्कार असून देशाच्या हितासाठी समर्थ सोशल फौंडेशन च्या या अभियानात नेहमी सक्रिय राहणार असल्याचेही सांगितले.
हा पुरस्कार मिळाल्याने किशोर थोरात यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.