Thursday, February 20, 2025

PCMC : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्स तर्फे नाना काटे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार प्रदान

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्स यांच्या वतीने आज 8 व्या युवा संसद चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जाधवर ग्रुप च्या वतीने विठ्ठल उर्फ नाना काटे यांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल “आदर्श नगरसेवक” पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल जाधवर ग्रुप चे नाना काटे यांनी आभार व्यक्त केले. (PCMC)

जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्स चा वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात याचे देखील नाना काटे यांनी कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री भागवत कराड, मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अरविंद सावंत, आमदार सत्यजित देशमुख,आमदार अमित गोरखे, ऍड.मंगेश ससाणे,वडगाव रासाई चे सरपंच सचिन शेलार यांना देखील उल्लेखनीय कार्याबद्दल विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (PCMC)

या संस्थेच्या माध्यमातून ज्या तरुणांना राजकारणात जायचे आहे अश्या तरुणांना मार्गदर्शन करण्याचे काम केले जाते. या कार्यक्रमप्रसंगी जाधवर ग्रुपचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दूल सुधाकर जाधवर, संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles