Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : ‘इस्त्रो’मधील शास्त्रज्ञ तेजस्वी शिंदे ही पिंपरी-चिंचवडकरांचा अभिमान!

PCMC : ‘इस्त्रो’मधील शास्त्रज्ञ तेजस्वी शिंदे ही पिंपरी-चिंचवडकरांचा अभिमान!

भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या भावना (PCMC)

अभियांत्रिकी विद्यार्थी ते अंतराळापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी

पिंपरी चिंचवड / क्रांती कुमार कडुलकर : सर्वसामान्य कामगार कुटुंबात जन्माला आलेली तेजस्वी शिंदे हिने अभियांत्रिकी शाखेची विद्यार्थीनी ते अंतराळ संशोधनापर्यंतचा प्रवास यशस्वी केला आहे. (PCMC)

पिंपरी-चिंचवडकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे, अशी भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

भोसरी येथील तेजस्वी शिंदे ही विद्यार्थिनी राष्ट्रीय वैमानिक आणि अंतराळ प्रशासन (NASA) मधील कॉन्फरन्स यशस्वी पूर्ण केली. युएसएमधील कॉलोराडो येथे तिची पोस्ट डॉक्टरल साठी निवड झाली आहे. आज तेजस्वी शिंदे भारतात परतली. त्यावेळी कुटुंबियांसह आमदार लांडगे यांनी तिचे निवासस्थानी स्वागत केले. यावेळी तिचे आई-वडील आणि कुटुंबीय उपस्थित होते.

तेजस्वी शिंदे हिच्या प्रवासाची सुरुवात मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील बॅचलरची विद्यार्थिनी म्हणून झाली. तिला अंतराळ संशोधनाची आवड होती. इस्त्रोचे संचालक डॉ. ए.एस. किरणकुमार यांनी तिची स्पेस सेक्टरमध्ये निवड केली. एका वर्षानंतर, तिची सीएनआरएस, फ्रान्स येथे संचालक डॉ. स्टीफन मुझाफिओर यांनी निवड केली. ज्यामुळे तिला युनिव्हर्सिटी ऑफ साउथॅम्प्टन, यूके येथे एमएससी करण्याची संधी मिळाली.

जगभरातील 150 जागतिक शास्त्रज्ञांमधून तेजस्वी शिंदे हिची सॅबर ॲस्ट्रोनॉटिक्स येथे पदाची ऑफर देण्यात आली. जिथे तिने स्पेसक्राफ्ट चार्जिंगवर लक्ष केंद्रित करून स्पेस फिजिक्समध्ये ‘पीएचडी’ केली आहे. तसेच, बोस्टन कॉन्फरन्स (२०२१),स्वीडन स्पेस फिजिक्स कॉन्फरन्स (२०२२), आणि एआयएए यूएसए फ्लोरिडा कॉन्फरन्स (२०२३), ऑस्ट्रेलियन स्पेस रिसर्च कॉन्फरन्स होबार्ट, तस्मानिया (२०२३) सह, प्रतिष्ठित परिषदांमध्ये तिचे संशोधन सादर केले आहे.

प्रतिक्रिया :

एका सामान्य कामगाराच्या मुलीची गरुडझेप प्रेरणादायी आहे. 2024 मध्ये तेजस्वी शिंदे हिच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे तिला ‘‘ यूएस एअर फोर्स डिफेन्स अनुदान* द्वारे प्रायोजित कोलोरॅडो विद्यापीठात *पोस्ट डॉक्टरल’’ संशोधक पद मिळाले आहे. इस्त्रो ते आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संशोधनापर्यंत, तेजस्वीचा प्रवास भावी पिढीसाठी आदर्श आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

संबंधित लेख

लोकप्रिय