Wednesday, February 12, 2025

PCMC : स्वराज्य ग्लोबल प्री-स्कूल, चिखली येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : स्वराज्य ग्लोबल प्री-स्कूल, चिखली येथील लहान मुलांनी ७८ व्या स्वातंत्र्यदिनी सलग दोन दिवस १४ आणि १५ ऑगस्ट २०२४ रोजी ७८व्या स्वातंत्र्य दिनाचे उत्साहात आणि जोशात स्वागत करत विविध संस्कृतिक कार्यक्रम सादर केले. (PCMC)

सर्व मुलांनी तिरंगी रंगातले कपडे किंवा स्वतंत्रता सेनानींचे पोशाख घालले होते. शिक्षकांनी त्यांच्या संबंधित वर्गाच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले आणि मुलांनी विविध देशभक्तीपूर्ण नृत्ये आणि गाणी सादर केली.

यामुळे संपूर्ण सभागृह तिरंग्याच्या रंगांनी उजळले. मुलांनी आदराने उभे राहून एकत्र राष्ट्रीय गाणे गाणे सदर केले.

मुलांना आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची आणि महत्वाची माहिती देण्यात आली. यावेळी संपूर्ण वातावरणात उत्साह आणि देशभक्तीची भावना भरून गेली.

यावेळी प्रिन्सिपॉल माही चौरे, प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, कल्पना पोतदार मॅडम, डॉ. राम शेटे, श्री आणि सौ. सूर्यवंशी, सस्ते सर, केंजले काका, सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे आदी मान्यवरांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. (PCMC)


या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समिधा बागवे,आशिष सुपेकर आदी चिमुकल्याचा उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी बद्दल प्रोत्साहन पर सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे उत्तम व्यवस्थापन नि मुलांचा उत्साह पाहुन पालकांनी राणी माळी, मेगा पाटील, अश्विनी पाटील तसेच आयेशा शेख या गुरुवर्याचे आभार आणि कौतुक केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका लांबणीवर, वाचा काय आहे कारण !

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

Related Articles

- Advertisement -

Latest Articles