Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : अर्बन स्ट्रीटच्या अर्धवट कामामुळे नागरिकांच्या जीवाला धोका – अजित गव्हाणे

जबाबदार ठेकेदार, अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा
गुन्हा दाखल करा (PCMC)

अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखालील अर्बन स्ट्रीटच्या अर्धवट स्थितीतील कामामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी अनेकदा प्रशासनाला याबाबत सूचित करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. (PCMC)

---Advertisement---

यामुळे भोसरीतील एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेला कामात कुचराई करणारे ठेकेदार आणि अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे. (PCMC)

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना अजित गव्हाणे यांनी निवेदन (दि .27) ही मागणी केली आहे.

या निवेदनात अजित गव्हाणे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भोसरी मधील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखाली अर्बन स्ट्रीट उभारण्याचे नियोजन केले. यावर तब्बल 42 कोटीहून अधिक खर्च करण्यात आला आहे नागरिकांच्या कररूपी पैशातून कोट्यावधी रुपये खर्च करून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले. त्यानंतर हे काम अर्धवट सोडण्यात आले. अर्धवट सोडलेल्या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले. या कामाचे कठडे, कठड्यातून बाहेर आलेले लोखंडी गज नागरिकांच्या दुखापतीला कारण ठरत होते. (PCMC)

याचा फटका मात्र शुक्रवारी एका निष्पाप जीवाला बसला. भोसरीतील गव्हाणे वस्ती परिसरात एका नागरिकाची गाडी मारुती शोरूम समोर स्लिप झाली आणि ते थेट या कठड्यांच्या बाहेर आलेल्या लोखंडी गजावर जाऊन पडले.

हा लोखंडी गज बवले यांच्या छातीमध्ये आरपार घुसला. त्यात ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले मात्र त्यात त्यांचा मृत्यू झाला. या पूर्वीही या लोखंडी गजांमुळे नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र आता हा अर्बन स्ट्रीट अक्षरशः नागरिकांच्या जीवावर उठला आहे. (PCMC)

---Advertisement---

या सर्व अपघात प्रकरणाची चौकशी करून अशा प्रकारे चुकीचे व अर्धवट काम केलेल्या संबधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच तातडीने भोसरी उड्डाणपूलाखाली ज्या ठिकाणी असे धोकादायक लोखंडी गज दिसून येतात त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात व भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टाळाव्यात अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे देखील गव्हाणे यांनी म्हटले आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles