पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, जय गणेश साम्राज्य भोसरी, पुणे येथील विस्तारित कक्षाचे उद्घाटन आदरणीय किसनराव शंकर लांडगे व मच्छिंद्र आबु लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले, हा विस्तारित कक्ष कैलासवासी स्वर्गीय सौ. रंजना मच्छिंद्र लोंढे व कैलासवासी स्वर्गीय सौ. हिराबाई किसनराव लांडगे यांचे स्मरणार्थ करण्यात आला. (PCMC)
पंचकर्म विभागाचे उद्घाटन आदरणीय राजवैद्य समीर जमदग्नी सर यांच्या हस्ते करण्यात आले. निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल हे 5000 पेक्षा अधिक स्क्वेअर फुट मध्ये विस्तारलेले आहे.
या हॉस्पिटल मध्ये CGHS पेन्शनर्स, HE फॅक्टरी, IUCAA व विमाधारकांसाठी आयुर्वेद व पंचकर्म उपचारांसाठी कॅशलेस सुविधा तसेच व काही विमाधारकासाठी विमा परतावा सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत. (PCMC)
पन्नास पेक्षा अधिक स्टाफ, बारा पेक्षा जास्त डॉक्टर, सात पेक्षा जास्त पंचकर्म रूम व 25 हजार पेक्षा जास्त रुग्णांचा अनुभव असलेले संचालक वैद्य निलेश लोंढे व वैद्या सारिका निलेश लोंढे यांनी ही माहिती दिली.