पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर :पिंपरी चिंचवड शहरामध्ये कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांचे शारीरिक आरोग्य धोक्यात आले आहे.
आकुर्डी येथील संत तुकाराम व्यापार संकुलन जवळील सार्वजनिक उद्यानात काही अज्ञात व्यक्तींडून कचऱ्यास आग लावली जाते. विशेष म्हणजे त्या उद्याना जवळच आरोग्य विभागाचे कार्यालय सुद्धा आहे. वारंवार तेथील कचऱ्याला लागणाऱ्या त्या आगीमुळे तिथे दुर्घटनेची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे.
आज सोमवारी पहाटे तेथील कचऱ्यास अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्यात आली त्यामुळे तेथील परिसरात कचऱ्याचा धूर पसरून वायू प्रदूषण होत होते. तसेच त्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्या धुराचा त्रास होत होता. सदर नेहमी उघडेच असते कारण त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकच नाही.
नागरिकांना श्वसन विकार समस्या निर्माण होत आहेत.महापालिकेने यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून संबंधितावर गुन्हे दाखल करत तात्काळ कारवाई करावी.
शिवानंद चौगुले – सामाजिक कार्यकर्ते,आकुर्डी