पिंपरी चिंचवड – महानगरपालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेले आकुर्डी_चिखली रोड वरील कृष्णानगर येथील स्पाईन रोडच्या मध्येच चालू असलेला फन फेअर खेळास परवानगी देताना नागरी सुरक्षा संबंधातील निकषांची तपासणी न करता परवानगी दिल्याचे निदर्शनास येते. नागरिकांच्या दृष्टीने असुरक्षित असलेले फनफेअर खेळास दिलेली परवानगी रद्द करून ती तात्काळ बंद करण्यात यावे. (PCMC)
अशी मागणी प्रभाग अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय निगडी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले यांनी केली आहे. (PCMC)
सदर ठिकाणी आपत्कालीन मार्ग नाही, आग नियंत्रक साधने, धूम्रपानस मनाईचे फलक, विद्युत विभागाकडून विजेसाठी स्वतंत्र मीटर आढळून येत नाही.
त्या जागेवर महानगरपालिकेने निर्माण केलेले जॉगिंग ट्रॅक असून तो पूर्णतः बंद केल्याचे दिसते. तसेच सदर ठिकाण अत्यंत वर्दळीच्या असून खेळाच्या जागी पार्किंगचे समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे.
शिवाय त्या ठिकाणी तात्पुरते स्वच्छतागृह, निर्जंत पाण्याची सुविधा केलेली नाही, विजेसाठी मोठमोठे जनरेटर तसेच मोठ्या गेम साठी स्वतंत्र डिझेल इंजिन वापरले जात असल्याने परिसरातील नागरिकांना आवाजाचा व इंजिनाच्या धुराचा त्रास होत आहे. (PCMC)
सदर फन फेअर खेळासाठी चे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार करीत दिलेली परवानगी तात्काळ रद्द करून परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याचे खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : असुरक्षित फन फेअर खेळ तात्काळ बंद करण्याबाबत
---Advertisement---
- Advertisement -