पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – येथील बी टी आडवाणी धर्मशाळेत भारतीय योग संस्थेच्या वतीने आतंरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्यात आला. (PCMC)
या वेळी संस्थेचे पदाधिकारी मनोहर जेठवानी यांनी आपल्या मातृभाषेत बदलच्या भावना व्यक्त करताना सांगितले की, मी माझ्या आई वडिलांचे पुण्याईने सिंधी समाजात जन्माला आलो आणि माझी मातृभाषा सिंधी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे कारण सिंधी समाज हा मुळचा व्यापारी समाज आहे. (PCMC)
त्या आमचा समाज हा संपूर्ण जगात व्यवसायासाठी पोहचलेला आहे, आपण कुठल्या ही देशात गेलो तर तेथील शहरात नक्कीच आपल्या समाजाचा बांधव आपले मनापासून स्वागत करतो आणि त्या वेळी परदेशात सुध्दा सिंधी भाषा बोलताना जो आनंद मिळतो तो खूप वेगळा असतो.
या वेळी संस्थेचे पदाधिकारी मनोहर जेठवानी, ज्योती मुलचंदानी, पुजा मुलचंदानी, रविना मिरानी,चेतन ओछानी, महादेव गट्ट, राजु अडवाणी, शारदा दासानी, सुरिंदर मंघवानी, प्रदिप नाचानी, तारा धुमाळ, वर्षा चौधरी, सुनीत शरवानी, हर्षा मोटवानी,आदी मान्यवर आणि सदस्य उपस्थित होते.
PCMC : माझे परम भाग्य आहे की मी सिंधी समाजात जन्माला आलो – मनोहर जेठवानी
- Advertisement -