संविधान अमृत महोत्सव निमित्ताने कामगारांकडून प्रस्ताविकेचे वाचन (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि .२६ – भारतीय राज्यघटनेत राष्ट्रीय एकात्मकेला एकात्मतेसाठी मौलिक अधिकार दिलेले आहेत यात संचार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, जमाव स्वातंत्र्य,निवास स्वातंत्र्य, संघटना स्वातंत्र्य, मालमत्ता व व्यवसाय स्वातंत्र्य यामुळेच स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपल्या देशाची अभिमानास्पद प्रगती आहे संविधानातील राष्ट्राला अभिप्रेत असलेली मानवता महत्त्वाची आहे ती जपली पाहिजे असे प्रतिपादन कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. (PCMC)
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य, बांधकाम कामगार समन्वय समिती, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज शहरातील विविध ठिकाणी कामगारांनी एकत्र येऊन भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन केले.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते,प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, निमंत्रक किरण साडेकर, विभाग प्रमुख संजू कांबळे, शाखा अध्यक्ष रवींद्र गायकवाड, सुरेश भारले, रेवणसिद्ध कांबळे, नारायण जाधव, दिपाली मातोंडकर, हिरामण जाधव, नामदेव सुकळे, अर्जुन सुकळे, गोपाळ जाधव,विजय गंदिले, नाना जाधव ,तुकाराम माने आदी उपस्थित होते. (PCMC)
नखाते म्हणाले की, एकात्मिक भारतासाठी वैचारिक संस्कृती प्रगल्भ होणे गरजेचे आहे. एकात्म होण्यासाठी प्रयत्न होतील तेव्हाच राष्ट्र निर्मितीच्या कार्यात महत्त्वाचा वाटा ठरेल मात्र आज विचारांची जागा द्वेशाने घेतली असल्याचे विविध ठिकाणी दिसत आहे, त्यामुळे संविधानिक मूल्य आणि सार्वभौमत्वाच्या तत्त्वांना छेद देण्याचा प्रयत्न काही ठिकाणी केला जात आहे त्याला विरोध करणे गरजेचे असून संविधान रक्षणासाठी प्रयत्नांची गरज आहे.
आज भारतीय लोकशाही एका स्थित्यंतरापासून वाटचाल करत असताना आधुनिक भारतात आपण आहोत संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना संविधान वाचवण्यासाठी व ते सर्वांपर्यंत अभ्यासपूर्ण पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहण्याची गरजेचे आहे. असे ही त्यांनी नमूद केले.