Thursday, February 13, 2025

PCMC : इंद्रायणी थडी महोत्सवासाठी स्टॉल बुकिंगसाठी प्रचंड प्रतिसाद!

2 हजार स्टाॅलसाठी महाराष्ट्रभरातील बचतगटांची रस्सीखेच (PCMC)

नियोजन समितीच्या समन्वयक मुक्ता गोसावी यांची माहिती

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – महाराष्ट्रातील सर्वात मोठा इंद्रायणी थडी महोत्सवात स्टॉल मिळवण्यासाठी बचतगटांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. यंदा 2 हजार स्टॉल उभारण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. आतापर्यंत 3 हजार 700 हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे ‘लकी ड्रॉ’ द्वारे स्टॉल वाटप करण्यात येईल, अशी माहिती नियोजन समितीच्या समन्वयक मुक्ता गोसावी यांनी दिली. (PCMC)

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंच्या अध्यक्षा पुजा लांडगे यांच्या पुढाकाराने प्रतिवर्षी महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता प्रोत्साहन या हेतूने इंद्रायणी थडी महोत्सवाचे आयोजन केले जाते.

यावर्षी मोशी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या मैदानावर दि. 27 व 28 फेब्रुवारी 2025 आणि दि. 1 व 2 मार्च 2025 असे चार दिवस इंद्रायणी थडी महोत्सव भरवण्यात येणार आहे. ‘‘सन्मान स्त्री शक्तीचा.. अभिमान भारतीय संस्कृतीचा..’’ असे घोषवाक्य आहे. या महोत्सवामध्ये स्टॉलसाठी 9379909090 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, स्टॉल वाटप पूर्णत: मोफत (नि:शुल्क) आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfhhGO2YUThN64c_d4Ukacxf8EaNXbZFylIOsiIgCd4RBvpCg/viewform या लिंकवर फॉर्म भरावा. येत्या दि. 5 फेबुवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. दि.8 फेब्रुवारीपर्यंत स्टॉल वाटप लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती नियोजन समितीने दिली आहे. (PCMC)

स्वादिष्ट मेजवानी अन्‌ मनोरंजनाचा आस्वाद..!

इंद्रायणी थडी महोत्सवामध्ये शाकाहारी- मासांहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल, घरगुती जीवनाश्यक वस्तू, खेळणी, कपडे, ज्वेलरी, कटलरी, सौंदर्य प्रसाधने, सुका मेवा, खाद्य उत्पादने, कृषी उत्पादने, आरोग्य आणि व्यायाम संबंधित उत्पादने यासह डान्स, फॅशन शो, शस्त्र प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, गायन, फोटोग्राफी, रांगोळी, मेहंदी, मंगळागौरी सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रभरातील नागरिकांनी या महोत्साचा आनंद लुटावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles