पिंपरी चिंचवड : शाहूनगर, चिंचवड येथील अरण्यम सोसायटी मधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेला मोठी आग लागली. दुपारी दीडच्या सुमारास लागलेल्या या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. (PCMC)
आगीची खबर मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाच्या चिखली उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तसेच प्राधिकरण आणि तळवडे उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविली.
घटनास्थळी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, महावितरणचे अधिकारी कर्मचारीही येथे आलेले असून सोसायटीमध्ये घरामध्ये अडकलेल्या महिलाना, ज्येष्ठ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सर्वांनी केले, सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.
याबाबत येथील सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया चांदगुडे म्हणाल्या की, शाहूनगर मधील ही तिसरी घटना आहे, घरगुती विद्युत सुरक्षा प्रमाणित करण्यासाठी सुरक्षा मानके तपासून विद्युत सेफ्टी कडे लक्ष देऊन नागरिकांनी दक्ष राहिले पाहिजे. (PCMC)
पावसाळा सुरू झाला आहे पावसामुळे घराच्या भिंती तसेच पावसामुळे तूटलेल्या तारामुळे पाण्यात करंट उतरून शॉक लागण्याची शक्यता वाढते त्यामुळे सर्व सदनिका धारकांनी घरातील, घराबाहेरील, सोसायटी मधील, विजेच्या वायरिंग प्रमाणित करून घ्याव्यात. असे आवाहन सुप्रिया चांदगुडे यांनी केले आहे.


हेही वाचा :
अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर
धक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
ब्रेकिंग : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती
मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई
२० दिंडोरी, २१ नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान
ब्रेकिंग : 10th, 12th बारावीचा निकालाबाबत मोठी अपडेट
पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? वाचा काय म्हणाले मोदी !
25 दिवसांनंतर बेपत्ता अभिनेता घरी, अभिनेत्याने केला मोठा खुलासा
तुम्ही RSS सुद्धा नष्ट करायला निघाले उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
ब्रेकिंग : सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ, चांदीचाही विक्रम
ब्रेकिंग : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे RSS बद्दल मोठे विधान
पुण्यात विकृतीचा कळस ! पत्नीच्या गुप्तांगला लावले कुलूप
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या एप्रिल महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर