पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र , घरेलू कामगार विभागातर्फे आज कष्टकरी संघर्ष महासंघाचे कार्यालयात मध्ये गुणवंत कष्टकरी घरेलु कामगार उषा नारसोडे, जयश्री शेलार यांचा सन्मान करण्यात आला.
सावित्रीबाईंचा कार्याचा आदर्श घेत कामगार महिलांनी एकत्रित येऊन एकमेकास सहाय्य करत महिला वरील अन्याय दूर करून त्यांच्या हक्काची लढाई लढण्याचा निश्चय करण्यात आला. (PCMC)
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, महिला अध्यक्ष माधुरी जलमुलवार, निमंत्रक माया शेटे, विमल बनसोडे, नंदा जाधव, सरस्वती डोले, अविद्या मामडे, ज्योती पाखले, जयश्री शेलार ,
शांताबाई मिरशिष्ठी, सुमन सकाटे, बायजा सोनसाळे, रंजना मुरगुंडे, साधना काळे, निशा तांदळे, संगीता शिंदे, सुनंदा वैरागे, मीनाक्षी बोराटे आदी उपस्थित होते.
PCMC : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त गुणवंत कष्टकऱ्यांचा सन्मान
- Advertisement -