पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांची आकुर्डी येथे जयंती साजरी करण्यात आली.प्रदेश युवासेना सचिव विश्वजित बारणे यांनी कै. ठाकरे व कै.बोस यांच्या प्रतिमेला हार
अर्पण केला.
यावेळी दिलीप पांढरकर यांच्या पुढाकाराने जयंतीचे औचित्य साधून वृत्तपत्र वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर,ज्येष्ठ नेते दिलीप पांढरकर, शहर प्रमुख निलेश तरस, प्राजक्ता पांढरकर,अश्विनी बागल, अरुण डोइफोडे, हरीनारायण डोबाळे,उद्योग सेनेचे प्रमुख निखिल येवले, हेमचंद्र जावळे, सोनाली वाल्हेकर,विनायक चव्हाण, रामभाऊ सुपेकर, ॲड बाबूलाल वाघमारे, गोविंद वाघमोडे, तुकाराम कांचन,शहर संघटक शैला निकम, अशोक काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विश्वजीत बारणे म्हणाले कि, कै बाळासाहेब ठाकरे यांनी जे ऱाममंदिर उभारणीचे जे स्वप्न पहिले होते ते आज सत्यात उतरले आहे.त्यांची विचारधारा घेवून आम्ही समाजकार्य करीत आहोत. त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.सूत्रसंचालन व आभार हर्षवर्धन पांढऱकर यांनी मानले