Sunday, February 2, 2025

PCMC : जर्मनीमध्ये उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या मोठ्या संधी – डॉ. क्रिस्टीना रथ

पीसीयू मध्ये “एक्सप्लोर जर्मनी २०२५” चे यशस्वी आयोजन (PCMC)

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – जर्मनीमध्ये उच्च शिक्षण आणि रोजगार वाढीसाठी आगामी काळात आणखी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांनी जर्मन भाषा अवगत करावी आणि जर्मनीमधील विद्यापीठांमधून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती चा लाभ घेऊन स्वतःचे करिअर घडवावे असे मार्गदर्शन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. क्रिस्टीना रथ यांनी केले. (PCMC)

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) मध्ये “एक्सप्लोर जर्मनी २०२५” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जर्मनी संस्कृती, भाषाचा उत्सव साजरा केला.

यावेळी फर्ग्युसन सेंटर फॉर लँग्वेजच्या संचालक डॉ. सरिता केळकर, जीईडीयुचे कंट्री हेड कुबेर कपूर, दिल्ली दुतावासातील अधिकारी शरयू जोरकर, विद्यार्थिनी दक्षा ओक आदी उपस्थित होते.

पीसीयुच्या कुलगुरू डॉ. मनीमाला पुरी यांनी सांगितले की, खुल्या आर्थिक धोरणामध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय भाषा आणि इंग्रजी शिवाय ज्या देशात आपण शिक्षण घेऊ इच्छित आहोत, त्या देशातील भाषा शिकणे देखील आवश्यक आहे. आगामी काळात वाहन उद्योग क्षेत्रात जर्मनी सारख्या प्रगतिशील राष्ट्रात मोठ्या संधी तयार होणार आहेत. त्यासाठी पीसीयू च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. नवीन भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते.

डॉ. सरिता केळकर यांनी जर्मनी आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक समानतेबद्दल माहिती दिली.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles