पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : मानवी निरामय आरोग्यासाठी नियमानुसार वायु गुणवत्ता निर्देशांक हा 100 च्या आत असायला हवी. परंतु पिंपरी चिंचवड शहरामध्ये वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, बांधकाम व्यवसाय, अहोरात्र सुरू असलेली स्थापत्य विकासकामे, वाहनांची वाढलेली संख्या, वाहतूक कोंडी यामुळे हवेत पसरणारे धूलिकण, कार्बन उत्सर्जन यामुळे वायू गुणवत्ता निर्देशांक तब्बल 200 च्या पुढे गेला आहे. त्यामुळे श्वसन विषयक आजार असलेल्या नागरिकांना तसेच वयोवृद्ध नागरिकांना ज्यांना बीपी व डायबिटीस चा त्रास आहे व लहान मुले ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते त्यांना आरोग्याचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महानगरपालिकेने हा धोका टाळण्यासाठी अत्यंत तातडीने उपाय योजना करवी अशी मागणी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडचे प्रवक्ते प्रकाश हगवणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून राडारोडा नियंत्रित करावा
श्वसन विकार व्याधीग्रस्त नागरिकांचे सर्वेक्षणकरून त्यांना एन 95 मास्क उपलब्ध करून द्यावेत, बांधकाम साईट व विकास कामातून निर्माण होणारा राडारोडा आच्छादित करावा, त्याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करावी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बसेस, रिक्षा, लोकल ईई वाहतूक सेवेची क्षमता वाढवावी, इलेक्टरीक वाहनांना विशेष अनुदान द्यावे, विद्यार्थी, महिलांना प्रवास तिकिटावर सवलती द्याव्यात,आदी मागण्या प्रकाश हगवणे यांनी केल्या आहेत.
![Don't gift load shedding to citizens in Diwali – Santoshi Nair](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231107-WA0061-737x1024.jpg)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231106-WA0024.jpg)