पिंपरी चिंचवड – जागतिक आरोग्य दिन सप्ताह निमित्त लोकांचे आरोग्य सुदृढ राहावे, आजारापासून दूर राहावे,तसेच आरोग्याची काळजी कशी घ्यावी आदी प्रबोधन व्हावे म्हणून वेदस्पर्श क्लिनिक आणि वुई टूगेदर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोयल गरिमा हॉल, केशव नगर, चिंचवड येथे आयुर्वेद माहितीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. (PCMC)
या वेळी वैद्य गीतांजली क्षिरसागर यांनी आयुर्वेद, पंचकर्म, आहार मार्गदर्शन तसेच व्यायामाचे महत्त्व अशा विविध विषयांवर अत्यंत महत्त्वपूर्ण व लोकांना समजेल अशा पद्धतीने माहिती दिली. (हेही वाचा – ब्रेकिंग : भारताच्या माजी कर्णधारावर समलैंगिक असल्याचा पत्नीचा खळबळजनक आरोप)

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वुई टूगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे हे उपस्थित राहून लोकांना आरोग्याचे महत्व,आहार, व व्यायाम आदी मनोगत व्यक्त केले. (PCMC)
उपस्थित नागरिकांमधुन तीन लक्की ड्रॉ काढून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. (हेही वाचा – कुणाल कामराच्या प्रकरणावर ध्रुव राठीने दिली प्रतिक्रिया, पैसेही पाठवले)

या उपक्रमास नागरिकांकडून खूप छान प्रतिसाद मिळाला व उपक्रमाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
अध्यक्ष मधुकर बच्चे, माजी अध्यक्ष सलीम सय्यद, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे – सपकाळे, खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार रवींद्र सागडे, अनिल पाटोळे, रवींद्र काळे, अर्जुन पाटोळे, शंकरराव कुलकर्णी, पाटोळे ताई, अरविंद पाटील, अपर्णा कुलकर्णी, हेमलता सुतार, समीर दरेकर, मोनाली खांडेकर, प्रतीक्षा इंगळे, अनिता मुंडे, संतोष भवार,आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचा सहभाग घेतला. (हेही वाचा – न्यायाधीशाच्या घरी सापडले तब्बल 15 कोटीची रोख रक्कम, घरात आग अन्…)
तसेच चिंचवड परिसर मधील सुजान नागरिक यांचा देखील उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सचिव जयंत कुलकर्णी यांनी आभार मानले.