Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : आरोग्य कर्मचा-यांच्या आरोग्य आणि सुरेक्षेला महापालिकेचे प्राधान्य – विजयकुमार खोराटे

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे आरोग्य आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका नेहमी प्राथमिकता देत असून वेळोवेळी त्यांच्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात, असे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्येक्त केले. (PCMC)

पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ होणार आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने कर्मचाऱ्यांना आरोग्य व सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यासाठी पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे स्वच्छ्ता क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उप आयुक्त सचिन पवार, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झीटे, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड, सहाय्यक आरोग्य निरिक्षक शांताराम माने, शशिकांत मोरे यांच्यासह महापालिकेच्या ग, ड व ह क्षेत्रीय कार्यालयांमधील सफाई कर्मचारी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणाले, आरोग्य निरीक्षक व सफाई मित्र यांनी स्वच्छता करताना सुरक्षा साधनांचा वापर करावा. आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगी आत्मसात कराव्यात, आरोग्याची वेळोवेळी तपासणी करावी, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२४ ची माहिती दिली आणि कामकाज चांगल्या प्रकारे व वेळेत कसे पूर्ण करावे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात स्वच्छता मित्रांचा सन्मान अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी केले.

‘काम फाऊंडेशन’ यांच्याकडून क्षेत्रीय कार्यालय ग, ड, ह मधील मनपा, ठेकेदार व कंत्राटी सफाई कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले तसेच त्यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई कीटचा वापर करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.स्वच्छ भारत अभियान “क्षमता बांधणी, कौशल्य विकास व ज्ञान व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करण्यात आले.

PCMC

महापालिका उप आयुक्त सचिन पवार आरोग्य विभाग यांनी कार्यक्रमांचे प्रस्ताविक करताना कर्मचाऱ्यांना जीव्हीपी कसे कमी करावे तसेच कचरा वर्गीकरण करताना सुरक्षा साधनाचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे अजून एक वैशिष्टय म्हणचे संपूर्ण कार्यक्रम झिरो वेस्ट पद्धतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास गायकांबळे यांनी केले.

या प्रशिक्षणाच्या तिसरा टप्पा सोमवार,३ फेब्रुवारी २०२५ रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर येथे पार पडणार आहे. सकाळच्या सत्रात अ, ब क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचारी व दुपारच्या सत्रात घरोघरचा कचरा संकलन करणा-या वाहनांवरील कर्मचा-यांचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया:

स्वच्छता कर्मचा-यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी महापालिका विविध उपाय योजना करीत आहे. त्यांच्यामुळे शहर स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होते. महापालिकेच्या स्वच्छता विषयक धोरणात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला व सुरक्षेला नेहमी असते.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles