पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या १४ व्या शतकात लिहिलेला श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र वर्णन करणारा हा ग्रंथ आहे, श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी हा ग्रंथ लिहिला. असे श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) राजे शिवाजीनगर, चिखली प्राधिकरण केंद्राचे सेवेकरी महेश पोळ यांनी सांगितले. (PCMC)
घरामध्ये गुरूचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. अध्यात्मिक उन्नती होते,आमच्या केंद्रामध्ये दत्त जयंती निमित्त या ग्रंथाचे सामूहिक वाचन करण्यात आले, असे महेश पोळ म्हणाले.
गुरू माऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने आदरणीय चंद्रकांत दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे विभागाचे सतीश मोटे यांच्या नियोजना खाली सुमारे ११०० भाविकांनी सामूहिक गुरू चरित्र पारायण केले. यामध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
दत्त जयंती उत्सवानिमित्त चिखली प्राधिकरण राजे शिवाजीनगर पेठ क्र.१६ येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये दत्तजयंती सप्ताह निमित्त ११०० गुरुचरित्र पारायण उपक्रमात शेकडो महिला सहभागी झाल्या आहेत. (PCMC)
दत्त जयंती निमित्त आयोजित हा सोहोळा यशस्वी करण्यासाठी
सेवेकरी महेश पोळ, बंडू जमदाडे, प्रभाकर मोघे,प्रवीण कर्णेकर, राजेंद्र अब्दागिरे, कुलदीप राठोड, विश्वनाथ पवार, संजय हजारे, राजाराम घोलप, सोनाली बिर्ले, हर्षा पाचपांडे, रेश्मा भोंग, वृषाली शिंदे, मंगला नेहते, अरुणा पत्रे यांनी सेवा दिली.