पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – दि. ६ – भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना महापालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. (PCMC)
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.लक्ष्मण गोफणे, उपायुक्त विठ्ठल जोशी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत कुंभार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, गिरीश वाघमारे, युवराज दाखले,कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मनोज माछरे, बालाजी अय्यंगार तसेच जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे, अंकुश कदम, अनिल कु-हाडे आणि विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते. (PCMC)
भीमसृष्टी पिंपरी येथील तसेच हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनी परिसरातील आणि दापोडी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
एच.ए. कॉलनी येथील कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते संजय केंगले,रमेश जाधव, मिलिंद जाधव, सुरेंद्र पासलकर, सुरेश केंगले यांच्यासह कंपनी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. (PCMC)
दापोडी येथील कार्यक्रमास पोलीस अधिकारी निलेश वाघमारे, भास्कर जाधव तसेच माजी नगरसदस्य रोहित काटे, राजू बनसोडे, माजी नगरसदस्या चंद्रकांता सोनकांबळे, माई काटे, आशा धायगुडे शेडगे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
हे ही वाचा :
मोठी बातमी : माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय
95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत