पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : जिल्हा परिषद ,पुणे द्वारा आयोजित जिल्हास्तरीय रायफ़ल शुटिंगची स्पर्धा पिंपरी चिंचवड येथील स्वामी विवेकानंद स्पोर्टस कॉम्प्लेक्स चिखली येथे पार पडली. (PCMC)
या स्पर्धेत प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज ची इ. दहावीची विद्यार्थिनी कु.सारा जंगम या विद्यार्थिनीने १० मीटर ओपन साईट रायफ़ल शुटिंग प्रकारात अव्वल क्रमांक (सुवर्ण पदक) पटकाविले व विद्यालयास जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दिले.
विद्यालयात विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात येतात. यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. साराच्या या यशाबद्दल कमला एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, विद्यालयाच्या प्राचार्या सविता ट्रॅव्हीस, उपप्राचार्या लिजा सोजू यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. साराला रायफल शूटिंगमध्ये य़ांचे मार्गदर्शन लाभले.
डी.वाय.एस.एफ. चे संस्थापक रमेश वऱ्हाडे व रायफल शुटींग कोच अमर नेटके यांचे मार्गदर्शन लाभले.