Friday, December 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्क (GOYN) जागतिक संमेलन 2024 पुणे येथे...

PCMC : ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्क (GOYN) जागतिक संमेलन 2024 पुणे येथे संपन्न

१७ ते २१ नोव्हेंबर २०२४ (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्कचे (GOYN) पाचवे जागतिक संमेलन १७ ते २१ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत पुणे शहरात आयोजित करण्यात आले होते. (PCMC)

या संमेलनाचा मुख्य उद्देश तरुणांच्या आर्थिक, सामाजिक विकासाला चालना देणे आणि त्यांच्या करिअरसाठी आवश्यक संधी व कौशल्य विकासाचे मार्ग उभा करणे हा होता. या संमेलनाच्या पहिल्या दिवशी १७ नोव्हेंबरला बालेवाडी स्टेडियम, बॅडमिंटन हॉल मध्ये आपल्या मराठमोळ्या पुणेरी पद्धतीने जागतिक संमेलनाची सुरुवात झाली. या समारंभात 3००० पेक्षा अधिक लाईटहाऊसचे माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचबरोबर १२ देशातील १५ पेक्षा जास्त कम्युनिटीज मधील विविध तरुणाई या समारंभात सहभागी झाली होती.

या कार्यक्रमाला लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशनचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, अमेरिकेचे भारतातील राजदूत मा. एरिक गार्सेटी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री.शेखर सिंह, श्री. पृथ्वीराज बी.पी. अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका, हे मान्यवर उपस्थित होते.

तसेच यांच्या समवेत व्यासपीठावर, ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्कचे संचालक व संस्थापक श्री. जेमी मॅकऑलिफ आणि तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, “हाऊस ऑफ आद्या” या ज्वेलरी ब्रँडच्या संस्थापक, उद्योजिका सायली मराठे उपस्थित होत्या. (PCMC)

लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन यांनी सांगितले की, “लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनला जगभरातून आलेल्या विविध मान्यवरांचे स्वागत करताना अतिशय आनंद होत आहे. या जागतिक संमेलनाद्वारे आम्हाला तरुणांच्या करिअर विषयक समस्या सोडविणे आणि सर्वसमावेशक समाजनिर्मितीचे आमचे प्रयत्न मजबूत करण्याची संधी मिळत आहे.

या कार्यक्रमाद्वारे अर्थपूर्ण संवाद आणि विचारांची देवाण-घेवाण होण्यास अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. जागतिक संमेलनाच्या कालावधी मध्ये आम्ही विविध चर्चासत्रांमध्ये सहभागी होऊ व या माध्यमातून नव्या विचारांचा प्रवाह निर्माण होईल, अशी मला खात्री आहे. बदलत्या जगात तरुणांसमोर उभ्या असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू.” (PCMC)

या जागतिक संमेलनाच्या पाच दिवसाच्या कालावाधीमध्ये, GOYN मधील प्रमुख भागीदार आणि इतर मान्यवर पाहुण्यांनी पुणे शहरातील टिंगरे नगर, वारजे व वडगावशेरी लाईटहाऊस केंद्राला भेट दिली.

तिथे त्यांनी युवकांसोबत चर्चा केलीव त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या संमेलनात विविध प्रकारची चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती, त्यामुळे नवनिर्मितीसाठी तरुणांना प्रोत्साहन मिळाले. विविध देशातील तरुणांमध्ये परस्पर संवाद वाढला. ही चर्चासत्रे तरुणाईच्या समस्यांना दूर करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. यामुळे तरुणांच्या वैयक्तिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल.

भारतातील अमेरिकीचे राजदूत श्री. एरिक गार्सेटी म्हणाले की, “आपण भविष्याकडे पाहत असताना, एका राष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती ही त्या राष्ट्राची तरुणाई आहे, हे लक्षात घ्यायला हवे. तरुणाईच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन, कौशल्य-विकास करून आणि परस्पर-सांस्कृतिक संवादाला चालना देऊन, आपण भविष्य बदलण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, आपण युवकांना आर्थिक विकासाच्या संधीचे नवीन मार्ग उपलब्ध करून देऊ शकतो आणि युवकांना सक्षम करून, उद्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी मार्ग खुले करतो, अशा उपक्रमांद्वारे आपण आर्थिक संधींचे नवे मार्ग खुले करतो आणि परिवर्तनकर्ते बनवण्यासाठी सक्षम करतो.” (PCMC)

श्री. पृथ्वीराज बी.पी. अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका तरुणाईला संबोधताना म्हणाले की, पुणे शहराला जागतिक संमेलनाचे यजमानपद भूषवण्याचा मान मिळाला आहे. या व्यासपीठावर जगभरातील तरुण एकत्र येऊन आर्थिक विकास, रोजगार, आणि सक्षमीकरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतील. जगभरातील तरुण आज इथे एकत्र आले आहेत, यामुळे आर्थिक विकास, सक्षमीकरण व करियर अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल आणि तरुणांच्या मूलभूत समस्या दूर करताना सर्वांना एक नवीन दिशा मिळेल”

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेखर सिंग यांनी तरुणाईला सांगितले की, “जगभरातून आलेल्या तरुणाईचे स्वागत करण्याची संधी पुणे शहराला मिळाली आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. अशा कार्यक्रमांमुळे विविध संस्कृतींमध्ये देवाणघेवाण होते आणि आपल्या युवकांच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यासाठी व्यासपीठ मिळते. जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या युवकांचे विचार आणि दृष्टिकोन एकत्र आणून, आपण तरुणांना रोजगारासाठी येणाऱ्या अडचणींवर एकत्रितपणे मात करू शकतो आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करू शकतो.”

ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्कचे संचालक व संस्थापक श्री. जेमी मॅकऑलिफ म्हणाले की, “GOYN मध्ये, ‘Opportunity Youth (OY) ओप्पोर्च्युनिटी युथची’ आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आम्ही कार्य करत आहोत. जगभरातील विविध संस्कृतींना सोबत घेऊन हे संमेलन होत आहे आणि हा अनुभव आम्हा सर्वांसाठी खूप छान आहे. यामुळे जगभरातून एकत्र येऊन तरुणाईचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करणे किती महत्त्वाचे आहे, हे परत एकदा लक्षात येते”

लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन:

लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन ही सामाजिक संस्था, भारतातील प्रतिकूल परिस्थितीमधील तरुणांचा कौशल्य विकास करून, त्यांना रोजगार आणि उद्योजकतेच्या संधीं देऊन, युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कार्य करत आहे. ही संस्था 2015 पासून सार्वजनिक व खाजगी भागीदारीद्वारे मोठ्या प्रमाणावर शहरपातळीवर युवकांना त्यांचे करियर घडवण्यासाठी व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कार्य करत आहे. या संस्थेला स्थानिक पातळीवरील प्रशासन पायाभूत सुविधा पुरवते आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या लाईटहाऊस अंतर्गत असलेल्या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक मदत करतात. आत्तापर्यंत 1.५ लाखाहून हून अधिक युवकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत आणि आता 2030 पर्यंत दहा लाख युवकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य जोमाने सुरु आहे.

2019 मध्ये, लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन, ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्क (GOYN) साठी अँकर पार्टनर बनले.

ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्क (GOYN):

ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्क (GOYN) हा एक सर्व समावेशक जागतिक उपक्रम आहे. तरुणांना आर्थिक संधी मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे करियर घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. जगभरातील शासकीय व खाजगी संस्थांना, समविचारी अँकर पार्टनर यांना सोबत घेऊन, तरुण तरुणींचे नोकरी व रोजगार विषयक प्रश्न सोडवण्यासाठी ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्क (GOYN) प्रयत्न करत आहे.

प्रतिकूल परिस्थितीमधील तरुण-तरुणींना जे योग्य नोकरी किंवा व्यावसायिक संधीच्या शोधात आहेत, आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी एका चांगल्या संधीच्या शोधात आहेत, अशा तरुणांना “अपॉर्च्युनिटी युथ Opportunity Youth” (OY) असे संबोधले जाते. अशा तरुणांचे शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी, नोकरी आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी व त्यांचे करियर घडवण्यासाठी GOYN कार्य करत आहे.

भारतातील पुणे, पिंपरी चिंचवड, भुवनेश्वर, कोलंबियातील बोगोटा, मेक्सिको सिटी, अमेरिकेतील साओ पाउलो आणि बॅरँक्विला; आफ्रिकेतील मोम्बासा, थीस आणि ट्विंकिनी या शहरात GOYN चे कार्य सुरु आहे.

अस्पेन इन्स्टिट्यूट फोरम फॉर कम्युनिटी सोल्युशन्स, यूएसए यांचा GOYN उपक्रम जागतिक स्तरावर सुरु आहे. जागतिक पातळीवरील अनेक खाजगी आणि शासकीय संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत, त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम विकसित होत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय