पिंपरी चिंचवड : लायन प्रीती बोंडे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून संपूर्ण लायन्स रॉकर्स टीमने एकत्र येत ओम शांती अनाथ आश्रमातील मुलींना छावा चित्रपट मिरज सिनेमा हॉल स्पाइन रोड येथे दाखविला. (PCMC)
लायन प्रीती बोंडे यांच्या संपूर्ण नियोजनाखाली हा कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये लायन प्रीती दीक्षित, प्रेयशा दीक्षित, डॉ. ज्योती क्षीरसागर, डॉ. प्रज्ञा देवकाते, प्रगती लाड, मनमित, लायन दिशा कदम, राजकुवर मोहिते, मुस्कान तांबोळी, श्रद्धा गुजराती, स्वीटी छाजेड आणि रेश्मा बारणे यांनी सहभाग घेतला.

त्याचबरोबर प्रणिता हिंगणे, व वनश्री तुरखडे सोनाली तुरखडे हे सुद्धा उपस्थित होते आयोजन करण्यात त्यांचा पण खूप मोठा वाटा आहे. (PCMC)
या उपक्रमाद्वारे मुलींना दोसा, पाणीपुरी, आईस्क्रीमसह त्यांना हवे असलेले पदार्थ देण्यात आले आणि त्यांच्यासोबत पाच तास आनंदात घालवले.
विशेषतः या चित्रपटाच्या तिकिटांचा संपूर्ण खर्च लायन्स रॉकर्स टीमने उचलला आणि त्याचबरोबर सर्व मुलींसाठी ट्रान्सपोर्ट सुविधा पुरवली, जेणेकरून कोणीही या आनंददायी क्षणांपासून वंचित राहू नये.
तसेच मिरज सिनेमा हॉल, स्पाईन रोड, चिंचवड यांनी सामाजिक जाणिवेची जाणीव ठेवत या उपक्रमात खारीचा वाटा उचलला. त्यांनी तिकिटांमध्ये सवलत देऊनच थांबले नाहीत, तर स्वतःच्या खर्चाने सर्व मुलींना कोल्ड्रिंक व पॉपकॉर्न देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. त्यांच्या या योगदानामुळे या उपक्रमाला अजून मोठे स्वरूप मिळाले आणि मुलींसाठी हा अनुभव अधिक संस्मरणीय ठरला. (PCMC)
या मुलींना छावा चित्रपट दाखवून आणि त्यांच्यासोबत पाच तास घालवून जो आनंद आम्हाला मिळाला, त्याचे समाधान शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य पाहून मन भरून आले आणि त्यांच्या डोळ्यांतील आनंद आमच्यासाठी दिव्यासारखा उजळून निघाला. या आनंददायी क्षणांचा साक्षीदार होण्याचा सन्मान आम्हाला लाभला याचा आम्हाला अभिमान वाटतो. असे प्रीती बोंडे यांनी सांगितले.
ऍक्टिव्हिटी चेअरपर्सन
लायन प्रीती बोंडे
आपल्या परिसरात आणखी असे कुठले आश्रम असतील आणि त्यांतील मुलींना हा चित्रपट पाहायचा असेल, तर आम्ही आनंदाने त्यांच्यासाठीही हा उपक्रम राबवू. समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची संधी मिळणे हेच आमचे खरे समाधान आहे.